उद्योगाची वाटचाल एका क्लिकवर, मिलापवर मिळवा भूखंड
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) भूखंड वितरणासाठी \'मिलाप\' ही नवी प्रणाली सुरू केली आहे. यामध्ये औद्योगिक, निवासी तसेच व्यावसायिक भूखंडांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) भूखंड वितरणासाठी \'मिलाप\' ही नवी प्रणाली सुरू केली आहे. यामध्ये औद्योगिक, निवासी तसेच व्यावसायिक भूखंडांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यापूर्वी भूखंड मिळवण्यासाठी अनेक कागदोपत्री प्रक्रिया करावी लागत होती; मात्र आता ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन झाली आहे. उद्योजक किंवा व्यावसायिकांना एका क्लिकवर उपलब्ध भूखंडाची माहिती मिळून अर्ज करणे सोपे झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींमधील उपलब्ध भूखंडांची माहिती या प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उद्योजक आणि व्यावसायिकांना या पोर्टलचा वापर करता येणार आहे. पारदर्शक पद्धतीने भूखंड वितरण होत असल्याने उद्योग क्षेत्राला चालना मिळेल, तसेच नवीन उद्योग उभारणीमुळे रोजगारनिर्मिती आणि स्थानिक आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे.
\'मिलाप\' या प्रणालीद्वारे एकावेळी राज्यातील त्या त्या जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील भूखंडाची माहिती उपलब्ध होते. यामुळे पैसे आणि वेळ वाचण्यास मदत होणार आहे.तसेच औद्योगिक, निवासी आणि व्यावसायिक भूखंडासाठी गुंतवणूकदाराला ई-बीडिंग ऑनलाइन पद्धतीने करता येते.
advertisement
\'मिलाप\' प्रणाली म्हणजे ?
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतींमधील भूखंडाचे वितरण ऑनलाइन करण्यात येत आहे. यासाठी एमआयडीसी इंडस्ट्रियल लँड अँड अलॉटमेंट पोर्टल म्हणजेच मिलाप ही संगणकीय प्रणाली सुरू झाली आहे.
औद्योगिक भूखंडाचे थेट वाटप..!
केंद्र आणि राज्यस्तरीय तसेच सार्वजनिक मोठे प्रकल्प इत्यादींच्या अटी पूर्ण करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी औद्योगिक भूखंडाचे थेट वाटप पारदर्शकतेने होणार आहेत.
advertisement
मिलाप प्रणालीमुळे कोणत्या औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंड उपलब्ध आहेत, याची माहिती मिळून इच्छुक त्या भागातील भूखंडासाठी अर्ज करून उद्योग सुरू करू शकतात. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नवीन उद्योग येतील, असे मानले जात आहे.
आता नोंदणी कुठे आणि कशी करायची?
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (https://milaap.midcindia.org/) या संकेतस्थळावर नोंदणी करून लॉगिन केल्यानंतर भूखंडाच्या गरजेनुसार तसेच पात्रतेनुसार प्रक्रिया निवडायची.
advertisement
भूखंडाच्या प्रकारानुसार अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे. प्रक्रिया शुल्क आणि ई-बीडिंगसाठी अनामत रक्कम भरून अर्ज पूर्ण सबमिट केल्यानंतर संबंधित क्षेत्रीय अधिकारी छाननी करतात. मंजुरीनंतर भूखंडाची शिल्लक रक्कम ऑनलाइन भरून प्राथमिक करारनामा करावा लागतो. विशेष: महत्त्वाचे म्हणजे व्यवसाय, उद्योगाची नोंदणी, परवाना, प्रोजेक्ट रिपार्ट, बँक खात्याचा तपशील, नगर पालिका किंवा नगर पंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे आवश्यक आहेत.
Location :
Maharashtra
First Published :
September 20, 2025 9:50 PM IST