नाशिकमध्ये मनसेकडून माजी की नवीन चेहऱ्यांना संधी? अर्ज भरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर

Last Updated:

Nashik Election 2025 : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मंगळवार, 30 डिसेंबर 2025 हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस ठरला.

Nashik election 2025
Nashik election 2025
नाशिक : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस ठरला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) नाशिक महानगरपालिकेसाठी आपली अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली आहे. विविध प्रभागांमधून आणि आरक्षण प्रवर्गांनुसार मनसेने उमेदवार उभे केल्याने पक्षाने यंदाच्या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिले असल्याचे स्पष्ट होत आहे.
advertisement
मनसेने शहरातील सर्वच भागांमध्ये स्थानिक पातळीवर ओळख असलेल्या आणि कार्यकर्तृत्वाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. महिला, अनुसूचित जाती-जमाती तसेच इतर मागासवर्गीय आरक्षणाचा समतोल राखत उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.
मनसेकडून कुणाला मिळाली संधी?
प्रभाग क्रमांक ३१ मधून ड आरक्षणात कोंबडे सुदाम विश्राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १ अ मधून गांगुर्डे प्रिया बाळकृष्ण, तर प्रभाग क्रमांक ३ ब मधून मंडलिक शितल विपुल आणि त्याच प्रभागातील ड आरक्षणातून भवर संदीप सुभाष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रभाग क्रमांक ४ मध्ये ब आरक्षणातून दौदे निकिता सागर, तर ड आरक्षणातून कुलकर्णी कविता हर्षल यांना संधी देण्यात आली आहे.
advertisement
प्रभाग क्रमांक ५ ड मधून जाधव नवनाथ जिवराम, प्रभाग क्रमांक ७ अ मधून खंडाळे सत्यम चंद्रकांत, तर प्रभाग क्रमांक ८ मधून क आरक्षणात कोरडे भाग्यश्री संतोष आणि ड-ब आरक्षणातून गुंबाडे विशाल सुरेश हे मनसेचे उमेदवार असतील. प्रभाग क्रमांक १० मध्ये ब आरक्षणातून जाधव किरण नामदेव आणि ड आरक्षणातून शेख फरीदा सलीम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
advertisement
प्रभाग क्रमांक ११ अ मधून भावले विशाल संपत, क आरक्षणातून काळे माया आणि जाधव गीता संजय हे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक १२ अ मधून तेजाळे किशोर विनायक, प्रभाग क्रमांक १३ ब मधून पवार मयुरी अंकुश, तर प्रभाग क्रमांक १६ क मधून सहाणे मिरा बाळासाहेब यांना पक्षाने मैदानात उतरवले आहे. प्रभाग क्रमांक १८ ब मधून पिल्ले रोहिणी संतोष आणि प्रभाग क्रमांक २३ ड मधून उपासनी स्वागता रमेश यांची निवड करण्यात आली आहे.
advertisement
प्रभाग क्रमांक २४ मध्ये ब-ड आरक्षणातून जगताप तुषार पुंडलिक, क आरक्षणातून रोजेकर सावित्री भिकन आणि दौदे संदीप गोपीचंद यांना उमेदवारी मिळाली आहे. प्रभाग क्रमांक २५ मध्ये ड-ब आरक्षणातून पाटील राहुल सुदाम, प्रभाग क्रमांक २६ क मधून पवार निर्मला भास्कर आणि बगडे अर्चना ज्ञानेश्वर, तर प्रभाग क्रमांक २७ मध्ये अ आरक्षणातून मोकळ शैला दीपक, क मधून खाडम किरण गंगाराम आणि ब मधून कोदे श्री सुधाकर व वेताळ वर्षा अरुण हे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक २९ ड मधून माळी नितीन जगन्नाथ यांना संधी देण्यात आली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिकमध्ये मनसेकडून माजी की नवीन चेहऱ्यांना संधी? अर्ज भरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement