Nagpur: शोकसभेला निघाले अन् मृत्यूने गाठलं, अहदाबाद विमान अपघातात नागपूरच्या एकाच कुटुंबातील 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू
- Published by:sachin Salve
Last Updated:
नागपूरमधील एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. सासऱ्या शोकसभेला लंडनला जाण्यासाठी निघाले होते पण वाटेतच त्यांना मृत्यूने गाठलं.
नागपूर : अहमदाबाद विमान अपघातात 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रवाशांचा समावेश आहे. अशातच नागपूरमधील एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. सासऱ्या शोकसभेला लंडनला जाण्यासाठी निघाले होते पण वाटेतच त्यांना मृत्यूने गाठलं.
नागपूरमधील क्वेटा कॉलनीत राहणारे मनिष कामदार यांची मुलगी यशा कामदार, त्यांचा मुलगा रुद्र कामदार आणि सासू रक्षा मोढा यांचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबाद विमान अपघाताची माहिती कळताच दुपारी ३ वाजता कामदार कुटुंबीय अहमदाबादला रवाना झाले आहे.
'यशा कामदार यांचे सासरे हे उपचारासाठी अहमदाबादला आले होते. ते लंडनला राहणारे होते. कॅन्सरचं उपचार घेत असताना त्यांचं निधन झालं होतं. लंडनला त्यांच्या ओळखीतील लोकांनी शोकसभा आयोजित केली होती. त्या शोकसभेसाठी सगळे लंडनला निघाले होते. यशा कामदार आणि त्यांचा मुलगा व यशा कामदार यांची सासू असे तिघे जण हे लंडनला चालले होते. यशा कामदार यांचे सासरे हे लंडनला व्यवसाय करत होते. व्यवसाय गुंडाळून ते अहमदाबादला आले होते' अशी माहिती कामदार यांच्या शेजाऱ्यांनी दिली.
advertisement
6 महाराष्ट्रातील प्रवासांचा मृत्यू
दरम्यान, एअर इंडियाच्या या विमानात असलेल्या 12 केबिन क्रू मेंबर्सपैकी 3 कर्मचारी महाराष्ट्राचे तर तीन जण प्रवासी असे एकूण 6 जण असल्याची माहिती समोर आली आहे. अपर्णा महाडिक, मैथिली पाटील आणि रोशनी राजेंद्र सोनघरे या तीन महिला अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या या विमानात होत्या.
अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांच्या नातेवाईक आहेत. अपर्णा महाडिक या सुनिल तटकरे यांच्या सख्ख्या भाच्याच्या पत्नी आहेत. दुपारी अहमदाबादहून लंडनचं विमान असल्यामुळे अपर्णा महाडिक या आज सकाळीच अहमदाबादला गेल्या होत्या. अपर्णा यांचे पतीही एअर इंडियामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय महादेव पवार, आशा पवार आणि मयुर पाटील हे तीन जणही या विमानामध्ये होते.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Jun 12, 2025 6:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur: शोकसभेला निघाले अन् मृत्यूने गाठलं, अहदाबाद विमान अपघातात नागपूरच्या एकाच कुटुंबातील 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू










