advertisement

एक महिला दोन तरुण, 24 तासात तिघांचा खून, सांगलीत नक्की काय घडतंय?

Last Updated:

मागील काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. सोमवारचा दिवस सांगलीकरांसाठी अत्यंत हादरवून सोडणारा ठरला आहे.

AI Generated Photo
AI Generated Photo
Crime in Sangli: मागील काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. सोमवारचा दिवस सांगलीकरांसाठी अत्यंत हादरवून सोडणारा ठरला आहे. सांगलीत अवघ्या २४ तासांत तब्बल तीन हत्येच्या घटना घडल्या आहेत. यात दोन तरुणांसह एका महिलेचा समावेश आहे. अवघ्या चोवीस तासात अशाप्रकारे तिघांची हत्या झाल्याने सांगली जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था चव्हाट्यावर आली आहे.
सोमवारी ३० मार्च रोजी सांगली जिल्ह्यात एकूण तीन खुनाच्या घटना समोर आल्या. जत तालुक्यात दोन, तर सांगलीच्या संजयनगर परिसरात एक अशा तीन घटना घडल्या आहेत. तर सांगलीतील तरुणावर धारदार कोयत्याने वार करून पलायन करत असलेल्या तरुणाला एका पोलीस कर्मचाऱ्याने पाठलाग करून पकडलं. मात्र इतर दोन प्रकरणातील आरोपी अद्याप निष्पन्न झाले नाहीत.
advertisement

जतमध्ये अॅसिड हल्ला करून महिलेची हत्या

सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील वळसंग रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, मृत महिलेवर अॅसिड हल्ला झाल्याचं दिसून आलं. अॅसिडने गंभीर भाजल्याने ३५ वर्षांच्या अनोळखी महिलेचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे. महिलेची हत्या कुणी केली? हे अद्याप समोर आलं नाही.
advertisement

जमीनीच्या वादातून तरुणाला भोसकलं

दुसऱ्या घटनेत जत तालुक्यातील बिळूर इथं श्रीधर यळगोड नावाच्या तरुणावर अज्ञातांनी धारदार हत्याराने वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार जमीन वादातून घडला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

सपासप वार करून पळणाऱ्या आरोपीला अटक

advertisement
तिसऱ्या घटनेत सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास संजयनगर परिसरातील मंगळवार बाजार येथे सौरभ पवार नावाच्या तरुणावर जीवघेणा हल्ला झाला. त्याच्यावर धारदार हत्यारानं हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जात होता. मात्र पोलीस कर्मचारी प्रदीप भोसले यांनी पाठलाग करून या संशयित तरुणाला हत्यारासह पकडलं. एकाच दिवशी अशाप्रकारे तीन हत्येच्या घटना उघडकीस आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एक महिला दोन तरुण, 24 तासात तिघांचा खून, सांगलीत नक्की काय घडतंय?
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement