तुळजाभवानी मंदिर तोडफोड प्रकरण, दारुड्या पुजाऱ्याला प्रशासनाने धडा शिकवला

Last Updated:

मंदिर संस्थान प्रशासनाकडून देऊळ कवायत कायद्यानुसार कारणे दाखवा नोटिस दिल्याने पुजाऱ्याने दारू पिऊन धिंगाणा केला.

तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्याचा राडा
तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्याचा राडा
तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयात दारू पिऊन पुजाऱ्याने गोंधळ केल्याचा प्रकार समोर आला होता. दारू ढोसून पुजाऱ्याने कार्यालयाची तोडफोड केली. त्याने दगड मारून दरवाजेही फोडले. मंदिर संस्थान प्रशासनाकडून देऊळ कवायत कायद्यानुसार कारणे दाखवा नोटिस दिल्याने पुजाऱ्याने दारू पिऊन धिंगाणा केला.
अनुप कदम असे गोंधळ घालणाऱ्या पुजाऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंदिर संस्थानाने गैरवर्तनामुळे नोटीस दिल्याचा राग मनात धरून अनुप कदम यांने मद्यपान करत तहसीलदार तथा व्यवस्थापक यांच्या नावे शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत काचेची तोडफोड केली होती.
तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयात तोडफोड करणारा पुजारी अनुप कदमवर मंदिर संस्थानाकडून 3 वर्ष मंदिर प्रवेशबंदीची कडक कारवाई करण्यात आली आहे. या अगोदर या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
पुजारी व्यवसायास न शोभणारे वर्तन असल्याचे स्पष्ट करीत सदर प्रकरणी जबाबदार धरून देऊळ कवायत कायदा कलम 24 व 25 अन्वये पुढील 3 वर्षांकरिता मंदिर प्रवेशबंदीचा आदेश पारित करण्यात आला आहे.

मंदिर बंदी का करण्यात येऊ नये, नोटिस देताच पुजाऱ्याचा गोंधळ

या प्रकरणाची चौकशी सुरू असताना मंदिर बंदी का करण्यात येऊ नये, अशी नोटीस दिल्याने त्याने गोंधळ घातला. घटनेनंतर मंदिर संस्थानकडून तुळजापूर पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 221, 352, 324(4) नुसार गुन्हा करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुळजाभवानी मंदिर तोडफोड प्रकरण, दारुड्या पुजाऱ्याला प्रशासनाने धडा शिकवला
Next Article
advertisement
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement