Sindhudurga Local Body Election : मोठी बातमी! कोकणात मोठी घडामोड, राणे बंधू आमने-सामने, तर शिंदे-ठाकरेंची युती!

Last Updated:

Eknath Shinde Uddhav Thackeray : स्थानिक पातळीवर अनेक समीकरणे समोर आली आहेत. कोकणात मोठी घडामोड झाली असून ठाकरे-शिंदे गटाची युती झाली आहे. तर, नारायण राणे यांची दोन्ही मुले आमने-सामने आली आहेत.

मोठी बातमी! कोकणात मोठी घडामोड, राणे बंधू आमने-सामने, तर शिंदे-ठाकरेंची युती!
मोठी बातमी! कोकणात मोठी घडामोड, राणे बंधू आमने-सामने, तर शिंदे-ठाकरेंची युती!
भरत केसरकर, प्रतिनिधी, सिंधुदुर्ग: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडाला असून नगर परिषद, नगर पंचायतीच्या लढतीचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. आज, १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याने स्थानिक पातळीवर अनेक समीकरणे समोर आली आहेत. कोकणात मोठी घडामोड झाली असून ठाकरे-शिंदे गटाची युती झाली आहे. तर, नारायण राणे यांची दोन्ही मुले आमने-सामने आली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात नव्या घडामोडी वेगाने घडल्या आहेत. कणकवली नगरपंचायत निवडणूक अनपेक्षित वळण घेतले आहे. शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना शिंदे गटाच्या शिवसेनेने जाहीर पाठिंबा देताच स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि शहर विकास आघाडीचे प्रमुख उमेदवार संदेश पारकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिंदे गटाचे उपनेते संजय आंग्रे आणि माजी आमदार राजन तेली स्वतः उपस्थित राहिले. संदेश पारकर हे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत. या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट एकत्र आले आहेत.
advertisement

राणेंना रोखण्यासाठी सर्वपक्षीय एकच मंचावर

कणकवलीतील निवडणूक चित्र अधिकच रोचक बनले आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या राजकीय प्रभावाला थोपवण्यासाठी विविध पक्ष आणि स्थानिक नेते एकाच मंचावर आले आहेत. शहर विकास आघाडीला मिळालेला शिंदे गटाचा पाठिंबा हा त्याच धोरणाचा भाग मानला जात आहे. या निवडणुकीत ‘राणे विरुद्ध राणे’ असाही सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
advertisement

राणे विरुद्ध राणे...

भाजपचे आमदार नितेश राणे आणि त्यांच्या विरोधातील पॅनलमध्ये सक्रिय भूमिका घेणारे निलेश राणे यांच्या आमनेसामने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कणकवलीतील या नवीन राजकीय मैत्रीमुळे नगरपंचायत निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलले असून, येत्या काही दिवसांत आणखी नाट्यमय घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत. नितेश राणे हे भाजपचे आमदार आहेत. तर, निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे वैभव नाईक यांचा पराभव केला होता. तर, दुसरीकडे राणे विरुद्ध राणे असे दिसत असताना दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले वैभव नाईक आणि निलेश राणे हे एकाच आघाडीत आले आहेत.
advertisement
संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती पाहून ही लढत अधिकच चुरशीची होणार, हे स्पष्ट झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sindhudurga Local Body Election : मोठी बातमी! कोकणात मोठी घडामोड, राणे बंधू आमने-सामने, तर शिंदे-ठाकरेंची युती!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement