advertisement

BMC: उद्धव ठाकरेंकडून ३ स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब, राज ठाकरे-शिंदे भेटीनंतर तातडीने निर्णय

Last Updated:

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे (शिवसेना पक्षप्रमुख)
उद्धव ठाकरे (शिवसेना पक्षप्रमुख)
मुंबई : मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. पक्षातील तीन निष्ठावंतांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे कळते.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महापालिका निवडणूक एकत्र लढले. तब्बल १७ वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. परंतु निवडणुकीत त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. निवडणूक निकालानंतर दोन्ही पक्षातल्या नेत्यांचे वेगवेगळे मतप्रवाह समोर येताना दिसले. तसेच काल मनसेप्रमुख राज ठाकरे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा झाली. मुंबई पालिका निवडणुकीत शिंदे-भाजपवर राज ठाकरे यांनी सडकून टीका होती. पण निवडणूक निकालानंतर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांच्या मनात नेमके काय सुरू आहे का? अशी चर्चा ठाकरेंच्या शिवसेनेत झाली. याच पार्श्वभूमीवर स्वीकृत नगरसेवकांचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी लगोलग घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
advertisement

कुणाला स्वीकृत नगरसेवकपदी संधी?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक या तीन नावांवर शिक्कामोर्तब केल्याचे सूत्रांनी सांगितले. तिन्ही चेहरे शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ असून तरूण युवा नेते आणि अनुभवी नेते अशी सांगड घालण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

स्वीकृत नगरसेवक कसे निवडले जातात?

स्वीकृत नगरसेवक हे थेट जनतेतून निवडून जात नाहीत. महानगरपालिकेत राजकीय पक्षांच्या शिफारशीनुसार सभागृहात नामनिर्देशित केलेले सदस्य म्हणजे स्वीकृत नगरसेवक. स्वीकृत नगरसेवक महापालिकेच्या कामकाजात सहभागी होतात. पण त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. ते सभागृहाच्या चर्चेत सहभागी होऊ शकतात.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC: उद्धव ठाकरेंकडून ३ स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब, राज ठाकरे-शिंदे भेटीनंतर तातडीने निर्णय
Next Article
advertisement
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा; टोलचे दर आयुष्यभर विसरणार नाही
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा
  • देशातील 5 महागडे टोल पॉइंट

  • 2 टोल नाके महाराष्ट्रात

  • टोलचे दर ऐकून फुटेल घाम

View All
advertisement