Uddhav Thackeray : पराभव झटकून ठाकरे लढाईला सज्ज, BMC निवडणुकीसाठी आखली रणनीती; मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं?

Last Updated:

Uddhav Thackeray,BMC Election : विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच तीन-चार महिन्यांनी महापालिका निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे या निवडणुका लक्षात घेता आज उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आजी-माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती.

Uddhav Thackeray news
Uddhav Thackeray news
Uddhav Thackeray, BMC Election : सुस्मिता भदाणे पाटील, मुंबई : साधारण आजपासून 10 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची शिवसेनेना युतीत असलेल्या महाविकास विकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. हा पराभव झटकून आता शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.यासाठी त्यांनी आज शिवसेनेच्या नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीत ठाकरेंनी नेमका नगरसेवकांना काय कानमंत्र दिला आहे? आणि मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत नेमकं काय काय घडलंय? हे जाणून घेऊयात.
विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच तीन-चार महिन्यांनी महापालिका निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे या निवडणुका लक्षात घेता आज उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आजी-माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ठाकरेंनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नगरसेवकांना मार्गदर्शन आणि काही सूचना दिल्या आहेत.
खरं तर मुंबई महापालिका हा ठाकरेंचा गड आहे. या गडावर पुन्हा एकदा भगवा फडकावण्यासाठी ठाकरेंनी मोठी रणनिती आखली आहे. या रणनितीनुसार ठाकरेंनी हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत आहे, उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार असल्याचे म्हटले आहे. त्या लोकांमध्ये जाऊन शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मांडा अशा सुचना ठाकरेंनी नगरसेवकांना दिला आहे. खंर तर आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्याला योग्य तो प्रतिवाद करा, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना दिल्या आहेत.
advertisement
तसेच भाजप पक्षासाठी बाहेरच्या राज्यातून लोक येऊन पक्षासाठी काम करतात. तसं आपणही तळागाळात जाऊन काम केलं पाहिजे, असं मत उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांसमोर मांडलं आहे. त्यामुळे आपल्याला मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे. निवडणुका कधीही लागतील त्यामुळे गाफील राहू नका, पुन्हा लोकांमध्ये जा आणि नव्याने ताकतीने कामाला लागा, असा कानमंत्रही ठाकरेंनी माजी नगरसेवकांना दिला आहे. त्याचसोबत ईव्हीएमचा मुद्दा आम्ही बघू पण तुम्ही संघटनात्मक बांधणी करायला सुरुवात करा, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागा,अशा सूचना उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना केल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : पराभव झटकून ठाकरे लढाईला सज्ज, BMC निवडणुकीसाठी आखली रणनीती; मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement