उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणात मोठी अपडेट, नर्तिका पूजा गायकवाडला कोर्टाचा दिलासा

Last Updated:

राज्यभर गाजलेल्या गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणी अटकेत असलेल्या नर्तिका पूजा गायकवाड हिला बार्शी सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

News18
News18
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: राज्यभर गाजलेल्या आणि खळबळ माजवलेल्या गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या नर्तिका पूजा गायकवाड हिला बार्शी सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने पूजा गायकवाड हिचा जामीन अर्ज मंजूर केला असून तिची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. पूजा गायकवाडच्या छळाला कंटाळून गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप होता.
advertisement

नेमकं प्रकरण काय?

हे प्रकरण ९ सप्टेंबर २०२५ रोजी घडलं होतं. बीड जिल्ह्यातील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सासुरे येथील नर्तिका पूजा गायकवाड हिच्या घरासमोरच आत्महत्या केली होती. त्यांनी आपल्या गाडीमध्ये रिव्हॉल्व्हरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली होती. या घटनेमुळे सोलापूरसह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या आत्महत्येप्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिला अटक करण्यात आली होती. मागील दोन महिन्यांपासून ती न्यायालयीन कोठडीत होती.
advertisement

जामीन अर्जावर काय झाला युक्तिवाद?

न्यायलयीन कोठडी मिळाल्यानंतर नर्तिका पूजा गायकवाड हिने आपले वकील अॅड. धनंजय माने यांच्यामार्फत बार्शी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर सुनावणी झाली, तेव्हा आरोपीचे वकील अॅड. धनंजय माने यांनी न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद केला.
advertisement
"पूजा गायकवाड हिला या प्रकरणात केवळ संशयावरून गुंतवण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मृत व्यक्ती गोविंद बर्गे यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. तसेच, या प्रकरणाचा तपास आता पूर्ण झालेला आहे. अशा परिस्थितीत एका महिला आरोपीला अधिक काळ कारागृहात डांबून ठेवल्यास काहीही साध्य होणार नाही," असा युक्तीवाद पूजा गायकवाडच्या वकिलांकडून करण्यात आला.
advertisement
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि प्रकरणाची सद्यस्थिती लक्षात घेऊन, अखेरीस नर्तिका पूजा गायकवाड हिचा जामीन अर्ज मंजूर केला. या निर्णयामुळे पूजा गायकवाड आणि तिच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणात मोठी अपडेट, नर्तिका पूजा गायकवाडला कोर्टाचा दिलासा
Next Article
advertisement
Chhatrapati Sambhaji Nagar Local Body Election : भाजपचा मास्टरस्ट्रोक! शिंदे गटाला जबर धक्का, संभाजीनगरच्या राजकारणात खळबळ
भाजपचा मास्टरस्ट्रोक! शिंदे गटाला जबर धक्का, संभाजीनगरच्या राजकारणात खळबळ
  • भाजपचा मास्टरस्ट्रोक! शिंदे गटाला जबर धक्का, संभाजीनगरच्या राजकारणात खळबळ

  • भाजपचा मास्टरस्ट्रोक! शिंदे गटाला जबर धक्का, संभाजीनगरच्या राजकारणात खळबळ

  • भाजपचा मास्टरस्ट्रोक! शिंदे गटाला जबर धक्का, संभाजीनगरच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement