BMC Election: मुंबईत काँग्रेसकडून वंचितला ६२ जागा, कोणत्या प्रभागात वंचितचे उमेदवार? यादी जाहीर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Vanchit Bahujan Aaghadi Candidate In Mumbai BMC Election: काँग्रेसने वंचितला ६२ जागा सोडल्या आहेत. कोणत्या प्रभागांत वंचित बहुजन आघाडी लढणार आहे, याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती जाहीर करण्यात आली. वंचित बहुजन आघाडी एकूण ६२ जागांवर निवडणूक लढणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्य उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युती जाहीर केली. यावेळी काँग्रेस नेते सचिन सावंत उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी युती संदर्भातील दोन्ही पक्षांच्या सहमती संदर्भातील मांडणी केली. यावेळी मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, महिला आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, युवा आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई हे उपस्थित होते.
कोणत्या ६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी लढणार आहे, याची माहिती समोर आली आहे. विशेषत: दलित आणि मुस्लिम मतदारांच्या प्रभावाखाली येणारे प्रभाग वंचित बहुजन आघाडी लढणार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.
advertisement
टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत, प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, वंचितचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे, मुंबई महिला आघाडी अध्यक्ष स्नेहल सोहनी, मुंबई युवा आघाडी अध्यक्ष सागर गवई उपस्थित होते.
कोणत्या प्रभागांत वंचितचे उमेदवार?
advertisement
मुंबई महानगरपालिकेसाठी वंचित आणि काँग्रेसची आघाडी जाहीर
काँग्रेसने कोणत्या जागा वंचितला सोडल्या? कोणत्या प्रभागात वंचितचे उमेदवार असणार? ही यादी.....⬇️@VBAforIndia @INCHarshsapkal @sachin_inc #BMCElections pic.twitter.com/5pBc4tUC7M
— Akshay Adhav | अक्षय आढाव (@Adhav_Akshay1) December 28, 2025
advertisement
२५ वर्षांनी दोन पक्ष एकत्र, वेळ लागला पण आता नव्या पर्वाला सुरुवात-हर्षवर्धन सपकाळ
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांची युती ही नैसर्गिक युती आहे. दोन्ही पक्षांची वैचारिक भूमिका एकच आहे. दोन्ही पक्ष संविधानवादी आहेत, संविधानाला अभिप्रेत भारत घडवणे हा दोघांचा विचार आहे. समता, बंधुत्व व सामाजिक न्यायाची भूमिका एकच आहे. दोन्ही पक्ष संवैधानिक मुल्यांशी तडजोड करणारे नाहीत. १९९८ व १९९९ च्या निवडणुकीत दोन्ही पक्षात आघाडी झाली होती, आता पुन्हा २५ वर्षांनी दोन पक्ष एकत्र आले आहेत. या प्रक्रियेसाठी थोडा वेळ लागला पण आजपासून नव्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. हा आकड्यांचा खेळ नसून विचारांचा मेळ आहे, असे सपकाळ म्हणाले.
advertisement
देश विघातक भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले-धैर्यवर्धन पुंडकर
वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यावेळी म्हणाले की, देश विघातक भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत. आघाडीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पहिले पाऊल टाकले व सुरुवातीपासूनच सकारात्मक भूमिका घेतली होती. मुंबई महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर लढणार आहे, असे पुंडकर यांनी सांगितले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 3:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: मुंबईत काँग्रेसकडून वंचितला ६२ जागा, कोणत्या प्रभागात वंचितचे उमेदवार? यादी जाहीर









