उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, श्रीकांत शिंदेंनी बोलावली खासदारांची बैठक, कोणत्या सूचना?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Vice President Election: एनडीकडून सी. पी. राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार म्हणून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता उभे आहेत. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या खासदारांची एक महत्वपूर्ण बैठक शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी दिल्लीत बोलावली आहे. तसेच आजच रात्री, रविवारी सर्व खासदारांना दिल्लीत येण्याचे निर्देश खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले आहेत.
येत्या ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी एनडीए कडून महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
मतदान कसे करावे, काय काय काळजी घ्यावी, खासदारांना विशेष सूचना
advertisement
डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांच्या विजयासाठी शिवसेना पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची महत्वपूर्ण बैठक सोमवार, ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बोलावली आहे. उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना जास्तीतजास्त मतांनी निवडून आणण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे हे निवडणुकीवर विशेष लक्ष ठेवून आहेत. मतदान कसे करावे, काय काय काळजी घ्यावी, अशा सूचना आधीच शिवेसनेच्या सर्व खासदारांना केल्या असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.
advertisement
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, एनडीए-इंडियाकडून जोरदार प्लॅनिंग
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याचे कारण देऊन आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मी यांच्याकडे पाठवला. त्यांच्या राजीनाम्यामुळे घटनेनुसार उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेणे कायद्याने अनिवार्य आहे. एनडीकडून सी. पी. राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 5:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, श्रीकांत शिंदेंनी बोलावली खासदारांची बैठक, कोणत्या सूचना?