Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागच्या राजाचं विसर्जन रात्री 10.30 नंतरच, मंडळाकडून आली मोठी अपडेट

Last Updated:

Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर झाल्याने सुधीर साळवी यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.

Lalbaugcha Raja Visarjan
Lalbaugcha Raja Visarjan
मुंबई : मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित गणेश मंडळ असा लौकिक असणाऱ्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर यंदा मोठी नामुष्की ओढवली आहे. अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी दुपार उलटूनही अद्याप लालबागचा राजाचे विसर्जन होऊ शकलेले नाही. गेल्या दहा तासांपासून लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर अडकला आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अजूनही प्रयत्न सुरु आहेत लालबागच्या राजाचं विसर्जन अजूनही रखडलं असून विसर्जनासंदर्भात मोठी अपडेच समोर आली आहे. लालबागच्या राजाचे दर्शन हे रात्री 10.30 नंतर विसर्जन होणार आहे. लालबाग सार्वजनिक मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी ही माहिती दिली आहे. तसेच विसर्जनाला उशीर झाल्याने दिलगिरी देखील साळवी यांनी व्यक्त केली आहे
समुद्राला आलेल्या भरतीमुळं लालबागच्या राजाची मूर्ती समुद्र किनाऱ्यावरच अडकलेली आहे. गेल्या 10 तासांपासून विसर्जनासाठी प्रयत्न सुरु आहेत. लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी यंदा खास स्वयंचलित तराफा आणण्यात आला आहे. या तराफ्यावर मूर्ती चढवण्यात काही अडचणी येत होत्या. अखेर अथक प्रयत्नांनतर राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात यश आले आहे. सुधीर साळवी म्हणाले, मुंबईत दोन दिवसापासून मुसळधार पऊस पडत आहे, त्यामुळे भरती लवकर आली. त्यामुळे आम्ही मंडळाने निर्णय घेतला की विसर्जन थांबवले पाहिजे कारण त्यावेळी विसर्जन करण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे मंडळाने निर्णय घेतला की विसर्जन थांबवला पाहिजे. सर्व भाविकांचा श्रद्धास्थान असलेला बाप्पाचा अयोग्य होण्यापेक्षा काही उशीर झालेला चालेल.
advertisement

यंदाच्या विसर्जनासाठी नवा तराफा : सुधीर साळवी 

लालबागचा राजा हा गिरगावला पोहोचण्यापूर्वी समुद्राला भरती आली होती.  भरती येण्यापूर्वी लालबागचा राजा हा तराफ्यावर येणे अपेक्षित होते,मात्र तसे झाले नाही. आम्ही दहा ते पंधरा मिनिटे उशिरा पोहोचलो. लालबागचा राजा हा कोट्यावधी लोकांचा भावना आहेत त्यामुळे मी मंडळाच्यावतीने दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही नियोजन करतो आणि होत नाही असं कधी होत नाही. अतिशय योग्य पद्धतीने साचेबद्ध पद्धतीने आम्ही अनेक वर्षे काम करत आहे. यंदाच्या विसर्जनासाठी अतिशय नवीन पद्धतीने   तराफा बनवला आहे. चांगल्या पद्धतीने हा विसर्जन सोहळा होईल. अनेक वर्ष कोळी बांधव या विसर्जन सोहळ्यात सहभागी होतात. आता हा तराफा पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सुधीर साळवी म्हणाले
advertisement

दहा तासांपासून लालबागचा राजा समुद्रात अडकला

लालबागचा राजा रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. त्यानंतर दीड-दोन तासांत लालबागचा राजाचे विसर्जन होणे अपेक्षित होते. मात्र, या काळात समुद्राला भरती आली. लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी जो तराफा तयार करण्यात आला होता, त्याची उंची जास्त असल्याने गणपतीची मूर्ती त्यावर उचलून ठेवावी लागणार होती. मात्र, भरती आल्याने लालबागचा राजाची मूर्ती या तराफ्यावर उचलून ठेवणे शक्य झाले नाही. परिणामी गेल्या दहा तासांपासून लालबागचा राजा समुद्रात अडकून पडला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागच्या राजाचं विसर्जन रात्री 10.30 नंतरच, मंडळाकडून आली मोठी अपडेट
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement