अजितदादांचा पुन्हा शरद पवारांना धक्का, बड्या नेत्याच्या मनगटावर 'घड्याळ'

Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी भविष्यातील संधी लक्षात घेता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

विजय भांबळे
विजय भांबळे
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी तथा जिंतूर विधानसभेचे माजी आमदार विजय भांबळे यांनी मूळ राष्ट्रवादीची साथ सोडून सत्तेत असणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला.

परभणीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढणार

परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात निवडणूक लढलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी भविष्यातील संधी लक्षात घेता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेशाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची परभणी जिल्ह्यातील ताकद वाढणार आहे.

स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीआधी पक्षप्रवेशासाठी रांग

advertisement
महिला विकास मंडळ सभागृह मुंबई येथे आज गडचिरोली, चंद्रपूर, परभणी, नागपूर, हिंगोली, अहिल्यानगर, आणि मानखुर्द शिवाजीनगर येथील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर नंदूरबारहून राज्याच्या दौरा सुरु करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवक युवतींना संधी देणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला सर्वांना सोबत घेऊन महिला, युवक, युवती यांना संधी द्यायची आहे असे सांगतानाच अजितदादा पवार यांनी यापुढे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार असे चार दिवस पक्षाला देणार असल्याचे जाहीर केले. पक्षात येणाऱ्या लोकांचा नक्कीच मानसन्मान राखला जाईल असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
advertisement
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम,पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार सना मलिक, आमदार राजेश विटेकर,आमदार राजू नवघरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश पदाधिकारी सुरेखाताई ठाकरे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर,आमदार डॉ. किरण लहामटे, प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांचा पुन्हा शरद पवारांना धक्का, बड्या नेत्याच्या मनगटावर 'घड्याळ'
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement