advertisement

Wardha: वेणा नदीच्या घाटावर रक्तरंजित थरार, भाजप नगरसेविकेच्या मुलाची निर्घृण हत्या, तलवारीने सपासप वार

Last Updated:

वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमाभागात रेती घाटाच्या वादातून रक्तरंजित थरार घडला आहे. इथं एका भाजप नगरसेविकेच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

News18
News18
नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा: वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमाभागात रेती घाटाच्या वादातून रक्तरंजित थरार घडला आहे. इथं रेती घाटाच्या पैशांच्या देवाण-घेवाणीवरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारी झाली. यात पुलगावच्या भाजपा नगरसेविकेचा मुलगा भरत नागपाल यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. टोळक्याने त्यांच्यावर तलवारीने सपासप वार केले आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता की यात नगरसेविकेच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण वर्ध्यासह चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, भरत नागपाल हे रेती घाटचालक होते. वर्धा व वरोरा सीमेवरील वेणा नदीच्या पात्रातील रेती घाटाच्या पैशांच्या व्यवहारावरून गेल्या काही दिवसांपासून दोन गटात वाद सुरू होता. याच वादाचं पर्यावसान रविवारी रात्री उशिरा हिंसक हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर तलवारीने सपासप वार केले.
या तुंबळ हाणामारीत आरोपींनी भरत नागपाल यांच्यावरही तलवारीने सपासप वार केले. या रक्तरंजित थरारात नागपाल यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नागपाल यांचा मृतदेह वेणा नदीच्या पात्रात फेकून दिला. या घटनेत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement

पोलीस कारवाई आणि तपास

या घटनेची माहिती मिळताच वडनेर आणि वरोरा पोलिसांनी तातडीने धाव घेतली. वडनेर पोलिसांनी तत्परता दाखवत या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली आहे. मात्र, या हत्याकांडात सहभागी असलेले इतर आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. मृत भरत नागपाल हे पुलगाव नगर परिषदेच्या विद्यमान भाजपा नगरसेविकेचे पूत्र होते. एका लोकप्रतिनिधीच्या मुलाची अशा प्रकारे हत्या झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही घटना वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पुढील तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Wardha: वेणा नदीच्या घाटावर रक्तरंजित थरार, भाजप नगरसेविकेच्या मुलाची निर्घृण हत्या, तलवारीने सपासप वार
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement