विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीचा पहिला उमेदवार ठरला, बच्चू कडू यांची घोषणा

Last Updated:

विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीकडून आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.

News18
News18
वर्धा, नरेंद्र मते, प्रतिनिधी : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यावेळी राज्यात महाविकास आघाडीविरोधात महायुती असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे या निवडणुकीमध्ये आता मनसेसोबतच तिसऱ्या आघाडीनं देखील उडी घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे, तिसऱ्या महाशक्ती आघाडीनं विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. आमदार बच्चू कडू यांनी याबाबत घोषणा केली.
वर्ध्याच्या आर्वी विधानसभा मतदारसंघाकरिता तिसऱ्या महाशक्ती आघाडीचा उमेदवार प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केला आहे. जयकुमार बेलखेडे हे तिसऱ्या महाशक्ती आघाडीचे विदर्भातील पहिले उमेदवार ठरले आहेत. बच्चू कडू यांनी जयकुमार बेलखेडे यांच्या नावाची घोषणा केली. दरम्यान इतर पक्षांसारखे बंद खोलीत पैशांची देवाणघेवाण करून उमेदवारी जाहीर करत नाही. तर आम्ही जाहीर सभेतून उमेदवारी जाहीर करणारे आहोत असा टोलाही यावेळी बच्चू कडू यांनी लागवला आहे.
advertisement
लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका  
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता. अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीनं राज्यात जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीची रणनीती काय असणार? कोणाच्या वाट्याला किती जागा येणार? इच्छुक उमेदवारांची बंडखोरी कशी टाळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीचा पहिला उमेदवार ठरला, बच्चू कडू यांची घोषणा
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement