ENG vs SA : 16 बॉल, 1 रन अन् 3 विकेट, जोफ्रा आर्चरने आग ओकली, इंग्लंडने मोडला भारताचा विश्वविक्रम
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या टीमने नवा इतिहास घडवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडने तब्बल 342 रननी विजय झाला आहे.
साऊथम्पटन : वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या टीमने नवा इतिहास घडवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडने तब्बल 342 रननी विजय झाला आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासामधला हा सगळ्यात मोठा विजय आहे. याआधी भारताने 2023 साली श्रीलंकेविरुद्ध 317 रननी विजय मिळवला होता. इंग्लंडने दिलेल्या 415 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा या सामन्यात फक्त 72 रनवर ऑलआऊट झाला.
जोफ्रा आर्चर हा इंग्लंडच्या या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरला. दुखापतीनंतर जोफ्रा आर्चरने मागच्याच महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. भारताविरुद्धच्या टेस्टमध्ये खेळण्यासाठी आर्चर मैदानात उतरला. तब्बल 4 वर्षांच्या विश्रांतीनंतर त्याचं टेस्ट टीममध्ये पुनरागमन झालं होतं. 2021 ते 2023 दरम्यान तो फक्त चार एकदिवसीय सामने खेळू शकला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो चांगल्या लयीत दिसत होता. मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चार विकेट्स घेणाऱ्या आर्चरने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वादळी सुरूवात केली.
advertisement
जोफ्रा आर्चरने पहिल्याच ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी सलामीवीर एडेन मार्करामला आऊट केले. विकेट कीपर जॉस बटलरने त्याचा कॅच घेतला. मार्करामला त्याचे खातेही उघडता आले नाही. यानंतर आर्चरने दुसरा ओपनर रायन रिकेल्टनलाही माघारी. रिकेल्टनने फक्त एक रन केली. जोफ्रा आर्चरने त्याच्या पहिल्या दोन ओव्हरमध्ये एकही रन न देता दोन विकेट्स घेतल्या.
advertisement
मॅथ्यू ब्रीट्झके पहिल्यांदाच फेल
दक्षिण आफ्रिकेचा मॅथ्यू ब्रीट्झकेने आतापर्यंत खेळलेल्या सर्व 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 किंवा त्याहून अधिक रन केल्या होत्या. जोफ्रा आर्चर एकदिवसीय सामन्यात अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वी त्याला आऊट करणारा पहिला बॉलर ठरला. आर्चरने त्याच्या तिसऱ्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर ब्रीट्झकेची विकेट घेतली. ब्रीट्झकेच्या बॅटमधून 10 बॉलमध्ये चार रन आल्या. आर्चरने त्याच्या पहिल्या तीन ओव्हरमध्ये फक्त एक रन देऊन तीन बॅटरना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
advertisement
पॉवरप्लेमध्ये दिल्या फक्त 5 रन
जोफ्रा आर्चरने बॅटिंग पॉवरप्लेमध्ये 5 ओव्हर टाकल्या. यामध्ये त्याने फक्त 5 रन दिल्या आणि चार विकेट घेतल्या. त्याने त्याच्या 5व्या ओव्हरमध्ये ट्रिस्टन स्टब्सलाही आऊट केले. यादरम्यान आर्चरने तीन मेडन ओव्हर टाकल्या. बॅटिंग पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेने 6 विकेट गमावून फक्त 24 रन केल्या. इंग्लंडने पहिले बॅटिंग करताना 414 रन केल्या होत्या. जेकब बेथलने 110 आणि जो रूटने 100 रनची खेळी केली. याशिवाय जेमी स्मिथने 62, जॉस बटलरने नाबाद 62, डकेटने 31 आणि विल जॅक्सने नाबाद 19 रन केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 11:07 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ENG vs SA : 16 बॉल, 1 रन अन् 3 विकेट, जोफ्रा आर्चरने आग ओकली, इंग्लंडने मोडला भारताचा विश्वविक्रम