तुम्हाला माहितीये का, कोर्ट मॅरेज आणि रजिस्टर मॅरेज दोघांमध्ये फरक काय? पाहा Video

Last Updated:

तुम्ही कोर्ट मॅरेज किंवा मॅरेज रजिस्टर हा शब्द ऐकला असेल. मात्र, कोर्ट मॅरेज आणि रजिस्टर मॅरेज यातला नेमका काय फरक आहे हे माहितीये का? पाहा

+
News18

News18

अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा : विशेष विवाह कायद्याने भारतात न्यायालयीन विवाह कायदेशीर केला आहे. या कायद्यानुसार, जरी जोडपे वेगवेगळ्या जाती, धर्म किंवा संस्कृतीचे असले तरीही ते एकमेकांशी लग्न करू शकतात. यादरम्यान तुम्ही कोर्ट मॅरेज किंवा मॅरेज रजिस्टर हा शब्द ऐकला असेल. मात्र, कोर्ट मॅरेज आणि रजिस्टर मॅरेज यातला नेमका काय फरक आहे हे माहितीये का? तर या दोन्ही शब्दांमधला फरक काय याबद्दल वर्धा येथील ॲडव्होकेट दिनेश शर्मा यांनी माहिती दिलीय.
advertisement
रजिस्टर मॅरेज म्हणजे काय?
मॅरेज रजिस्ट्रेशन हे कोणत्याही लग्नाच्यानंतर कधीही करता येतो. समजा एखाद्याचं पारंपरिक पद्धतीने रीती रिवाजानुसार लग्न झाले आहे. ते कोणत्याही धर्माच्या रितीनुसार असो. हिंदू, मुस्लिम, जैन, बौद्ध कोणत्याही धर्माच्या रितीनुसार कधीही लग्न झालं असेल तरी त्यानंतर कधीही मॅरेज रजिस्ट्रेशन करता येते. त्याचं त्या जोडप्याला लग्न झाल्याचं कायदेशीर प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाण पत्रासाठी जोडप्याला आमचं लग्न झालं असल्याचा पुरावा द्यावा लागतो. लग्न कधी झालं यासंदर्भात पुरावा तसेच लग्न लावून देणाऱ्या गुरुजींचेही शपथ पत्र द्यावे लागते. सोबतच साक्षीदारांचेही शपथपत्र द्यावे लागते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्टिफिकेट मिळून जातं. त्याला रजिस्टर मॅरेज म्हणतात, असं ॲडव्होकेट दिनेश शर्मा सांगतात.
advertisement
कोर्ट मॅरेज म्हणजे काय?
कोर्ट मॅरेज करण्यासाठी 1 महिन्याच्या आधी नोटीस द्यावी लागते. त्यामध्ये दाखवावे लागते की आम्ही दोघेही अविवाहित आहोत. किंवा आता आमच्यापैकी कोणाचाही पती किंवा पत्नी अस्तित्वात नाही. आम्ही लग्नाच्या वयानुसार पात्र आहोत. हे सर्व कागदपत्रे एकत्र करून 31 व्या दिवशी प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी मुलगी 18 वर्ष आणि मुलगा 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठी जन्म प्रमाणपत्र, लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि त्यांना ओळखणारे 3 साक्षीदार पाहिजे. या कोर्ट मॅरेज करत असताना लग्न लावून देणाऱ्या पंडितजी किंवा गुरुजींची आवश्यकता नसते. हे लग्न रजिस्टर ऑफिसमध्ये कायद्याने लावले जाते, असं ॲडव्होकेट दिनेश शर्मा सांगतात.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
तुम्हाला माहितीये का, कोर्ट मॅरेज आणि रजिस्टर मॅरेज दोघांमध्ये फरक काय? पाहा Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement