OBC प्रवर्ग म्हणजे नेमकं काय? यात कोणत्या जातींचा समावेश होतो? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
OBC मध्ये वर्गवारी करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. त्यामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रवर्ग केले आहेत.
शिवानी जोशी, प्रतिनिधी
पुणे: महाराष्ट्रात सध्या आरक्षणावरून अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच ओबीसी (OBC) आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी होतं आहे. ओबीसी म्हणजे नेमकं काय? आणि यात कोणत्या जातींचा समावेश होतो हे अनेकांना माहिती नाही. याबाबत ओबीसी अभ्यासक लक्ष्मण हाके यांनी माहिती दिली आहे.
ओबीसी म्हणजे नेमकं काय?
ओबीसी हा भारतातील एक मागास प्रवर्ग आहे ज्याला इतर मागास वर्ग किंवा ओबीसी (Other Backward Class) असे म्हटले जाते. या प्रवर्गामध्ये अनेक जातींचा समावेश होतो. हा सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग आहे. ओबीसींचे मूळ भारतीय राज्यघटनेच्या कलम 16 (4 आणि 340) मध्ये आहे. जिथे ते OBC च्या मागासवर्गीय लोकसंख्येच्या नावाने संकलित केले आहे.
advertisement
महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य
ओबीसीमध्ये वर्गवारी करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. त्यामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रवर्ग केले आहेत. यात व्हीजेएनटी (VJ-NT ABCD) अशी वर्गवारी केली आहे. यात व्हीजेएनटी ए (VJ-NT A) मध्ये ज्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारला गेला अशा जाती येतात. व्हीजेएनटी बी (VJ-NT B) मध्ये या राज्यातील बहुजनांच्या देवांची आराधना करणाऱ्या जाती येतात. जोशी, वेडिंगे जोशी, कुडमुडे जोशी, गोंधळी, नाथपंथी, डवरी गोसावी या जातींचा समावेश यामध्ये होतो. व्हीजेएनटी सी (VJ-NT C) मध्ये धनगर समाज येतो. तर व्हीजेएनटी डी (VJ-NT D) मध्ये वंजारी समाज येतो. ओबीसी मधील एसबीसी (SBC) प्रवर्गात दोन टक्के समाज येतो. यात सोन कोळी, पान कोळी सारख्या अनेक जाती येतात, अशी माहिती हाके यांनी दिली.
advertisement
ओबीसीमधील समाविष्ठ जाती
view commentsकुणबी, साळी, कोष्टी, तेली, भावसार, वाणी, शिंपी, नाभिक, परीट, गुरव, गवळी, जंगम, पांचाळ, फुलारी, रंगारी, सुतार, कासार, धनगर, भंडारी, तांडेल, तांबट, मोमीन, घडशी, विणकर, आगरी, कुंभार, सोनार, कोळी, लोहार, शिंपी, माळी, बंजारा अशा अनेक जाती ओबीसी या प्रवर्गामध्ये मोडतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
February 06, 2024 5:57 PM IST