स्थानिक निवडणुकीसाठी CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! पण 'या' ठिकाणी महायुतीतच ‘टोकाचा’ संघर्ष अटळ

Last Updated:

महायुती सरकारमध्ये जरी एकत्र असली तरी कोकणात जवळपास प्रत्येक ठिकाणी मित्रपक्षांमध्येच रस्सीखेच असून, अंतर्गत गटबाजी...

News18
News18
राहुल झोरी, प्रतिनिधी
मुंबई :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील भाजपची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी विभागनिहाय बैठकींचा धडाका सुरू केला आहे. पक्षानं शक्य तिथे स्वबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी सुरू केली असून भाजप एकटं लढून जिंकण्याची जोरदार तयारी करत असल्याचं संकेत या बैठकींमधून दिसत आहेत.
advertisement
स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या रणधुमाळीला आता लवकरच सुरुवात होणार आहे. पण सत्ताधारी गटातच मैदानात उतरण्याआधी धुसफूस सुरू असल्याचं समोर आलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक दंड थोपडून मैदानात उतरले आहे. तर दुसरीकडे राज्यभरातही अनेक ठिकाणी अशीच परिस्थितीत आहे. ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार गटातून आलेल्या नेत्यांमुळे महायुतीतच रस्सीखेच सुरू झाली आहे.
advertisement
ठाणे - कोकण विभागात  संघर्ष अटळ
ठाणे हा जिल्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होमग्राऊंड. पण इथं गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे गट असा सरळ संघर्ष सध्या सुरू झाला आहे. गणेश नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये वाद पेटला आहे. यापूर्वीही ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत जुळवून घेणारे ठाण्यातील भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांचीही आता गणेश नाईकांना साथ दिली आहे.
advertisement
तर, तळ कोकणातही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री नितेश राणे विरुद्ध नव्यानं शिवसेनेत दाखल झालेले राजन तेली, आमदार निलेश राणे असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. तसंच रत्नागिरीत उदय सामंत यांचा प्रभाव असला तरी भाजपही आपलं बळ तपासण्याच्या तयारीत आहे.
रायगडमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात चुरशीचा संघर्ष
रायगडमध्ये आधीच पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि अजित पवार गटामध्ये वाद चांगलाच शिगेला पोहोचला होता. आता स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीतही याचे पडसाद पाहण्यास मिळणार आहे. रायगडच्या होमग्राऊंडवर  सुनिल तटकरे आणि कुटूंब विरूद्ध - महेंद्र थोरवे - भरतशेट गोगावले आणि महेंद्र दळवी असा थेट संघर्ष पाहण्यास मिळणार आहे.
advertisement
महायुती सरकारमध्ये जरी एकत्र असली तरी कोकणात जवळपास प्रत्येक ठिकाणी मित्रपक्षांमध्येच रस्सीखेच असून, अंतर्गत गटबाजी, स्थानिक नेत्यांचा प्रभाव आणि राजकीय वर्चस्व यावरून हा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
स्थानिक निवडणुकीसाठी CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! पण 'या' ठिकाणी महायुतीतच ‘टोकाचा’ संघर्ष अटळ
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement