Manache Shlok Controversy : 'मनाचे श्लोक' वरून पुण्यात गोंधळ, आधी धमकी मग शो बंद पाडले; कोथरुडमध्ये हिंदूत्ववाद्यांनी पोस्टर फाडले

Last Updated:

Manache Shlok Movie Controversy : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या पवित्र ग्रंथाचे नाव वापरल्याबद्दल हिंदुत्ववादी संघटनांनी 'मनाचे श्लोक' चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर, चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होतो न होतो तोच, पुण्यामध्ये मोठा गोंधळ झाला आहे.

अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : मराठी चित्रपट 'मनाचे श्लोक' सध्या न्यायालयीन लढाई आणि तीव्र विरोधामुळे जोरदार चर्चेत आहे. राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या पवित्र ग्रंथाचे नाव वापरल्याबद्दल हिंदुत्ववादी संघटनांनी या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर, चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होतो न होतो तोच, पुण्यामध्ये मोठा गोंधळ झाला आहे.

हायकोर्टाचा हिरवा कंदील, पण रस्त्यावर विरोध

'मनाचे श्लोक' या शीर्षकामुळे हिंदूंच्या श्रद्धा दुखावल्या जात आहेत, असा आरोप करत हिंदु जनजागृती समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या पवित्र नावाचा वापर करून लिव्ह-इन संबंधांवर आधारित चित्रपट बनवणे हा समर्थ रामदास स्वामींचा अपमान आहे, अशी त्यांची भूमिका होती. या याचिकेवर सुनावणी करताना माननीय उच्च न्यायालयाने मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे चित्रपटाच्या टीमने आनंद व्यक्त केला आणि प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाल्याचे जाहीर केले. चित्रपट प्रदर्शित करण्याचा न्यायालयाचा निर्णय 'मनाचे श्लोक' टीमने प्रसिद्धीपत्रक काढून स्वागत केला.
advertisement

पुण्यात हिंदू संघटनेचा धडक मोर्चा!

न्यायालयाने चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला असला तरी, हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध काही थांबलेला नाही. चित्रपटाच्या शीर्षकावरून असलेल्या आक्षेपामुळे, गुरुवारी संध्याकाळी पुण्यात कोथरूड येथील एका थिएटरमध्ये 'मनाचे श्लोक'चा प्रिमीयर शो सुरू होताच, हिंदुत्ववादी संघटनांनी थिएटरमध्ये धडक मारली. त्यांनी थेट चित्रपट निर्मात्यांवर हल्लाबोल करत हा शो जबरदस्तीने बंद पाडला. लिव्ह-इन रिलेशनवरच्या सिनेमाला 'मनाचे श्लोक' हे नाव देऊन समर्थ रामदास स्वामींचा अपमान केला जात आहे, अशी संतप्त भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. यानंतर, आज पुण्यातील या चित्रपटाचे सर्व शो बंद पाडण्यात आले आहेत.
advertisement

संस्कृती विरुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्य

एकीकडे उच्च न्यायालय चित्रपटाच्या बाजूने उभे राहिले आहे, तर दुसरीकडे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. 'मनाचे श्लोक' या शीर्षकावरून निर्माण झालेला हा वाद अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक आदर यांच्यातील संघर्षाला अधोरेखित करतो. आता गोंधळ आणि न्यायालयीन लढाईतून मार्ग काढत हा चित्रपट महाराष्ट्रात पूर्णपणे प्रदर्शित होतो का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Manache Shlok Controversy : 'मनाचे श्लोक' वरून पुण्यात गोंधळ, आधी धमकी मग शो बंद पाडले; कोथरुडमध्ये हिंदूत्ववाद्यांनी पोस्टर फाडले
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement