Varinder Ghuman Death : वरिंदर घुम्मणचा मृत्यू डॉक्टरांमुळे झाला? मित्राचा गंभीर आरोप! केली CCTV फुटेजची मागणी
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Varinder Singh Ghuman Death : आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर आणि अभिनेता वरिंदर सिंग घुम्मण यांचे ४२ व्या वर्षी झालेले आकस्मिक निधन गूढ बनले आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर आणि अभिनेता वरिंदर सिंग घुम्मण यांचे ४२ व्या वर्षी झालेले आकस्मिक निधन गूढ बनले आहे. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी अमृतसरच्या फोर्टिस रुग्णालयात एका छोट्या शस्त्रक्रियेदरम्यान दोन हृदयविकाराचे झटके येऊन त्यांचे निधन झाले, असे रुग्णालयाने जाहीर केले असले तरी, त्यांच्या मित्रांनी मात्र ही केवळ अपघाती घटना नसून डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
advertisement
वरिंदर घुम्मण यांच्या जवळच्या मित्रांनी अमृतसरच्या फोर्टिस रुग्णालयाच्या डॉक्टरांवर थेट बोट ठेवले आहे. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, मित्रांनी आरोप केला आहे की, 'टायगर ३' चित्रपटातील या अभिनेत्याचे शरीर रुग्णालयात निळे पडले होते, तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.
advertisement
मित्रांचे म्हणणे आहे की, डॉक्टरांनी वरिंदरला खूप वेळ दुर्लक्षित ठेवले आणि त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवली नाही. त्यांनी डॉक्टरांवर जाणीवपूर्वक निष्काळजीपणा केल्याचा आरोप लावला असून, वरिंदर यांच्या बायसेप ऑपरेशनचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली आहे.
advertisement
या आरोपानंतर वरिंदरच्या मित्रांमध्ये आणि फोर्टिसच्या डॉक्टरांमध्ये जोरदार वाद सुरू झाला आहे. डॉ. अनिकेत यांनी स्पष्ट केले की, ऑपरेशनच्या वेळी आणि नंतर दिलेल्या सर्व औषधांची नोंद फाईलमध्ये आहे आणि ती तपासणीसाठी उपलब्ध आहे.
advertisement
मात्र, सीसीटीव्ही फुटेजबाबत डॉक्टरांनी 'ऑपरेशन थिएटरमध्ये फुटेज रेकॉर्ड झालेले नाही, फक्त बाहेरचे फुटेज उपलब्ध आहे' असे सांगून हात वर केले. उपलब्ध फुटेजमध्ये वरिंदर यांचा बेड दिसत नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे मित्रांनी हा मोठा निष्काळजीपणा असल्याचा आरोप केला असून, योग्य चौकशीची मागणी लावून धरली आहे.
advertisement
रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोमी यांनी सांगितले की, वरिंदर सिंग घुम्मण यांच्या प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल लवकरच जारी केला जाईल. सध्या या प्रकरणाची माहिती मंत्र्यांपर्यंत पोहोचली असून, ते चौकशी करत आहेत. मात्र, अद्याप वरिंदर यांच्या मित्र-परिवाराकडून किंवा पोलिसांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.
advertisement
'मरजावां' अभिनेत्याच्या निधनाने फिटनेस समुदायाला धक्का बसला असला तरी, त्यांच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार हा अपघात त्यांच्या जीवनशैलीमुळे नसून डॉक्टरांच्या चुकीमुळे घडला आहे. वरिंदर घुम्मण यांच्यावर १० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता जालंधरच्या मॉडेल टाउन येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.