Jaya - Rekha : अमिताभच्या आधी जयाच्या आयुष्यात होती रेखा, सख्ख्या बहिणींप्रमाणे होतं रिलेशन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rekha - Jaya Bachchan Friendship : अभिनेते अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअर्सच्या अनेक वर्ष सुरू आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का रेखा आणि जया एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या.
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे नवरा बायको असले तरी रेखा आणि अमिताभ यांच्या कथित अफेअरच्या चर्चा वर्षानुवर्ष इंडस्ट्रीत सुरू आहेत.
advertisement
अमिताभ आणि रेखा यांची लव्ह स्टोरी तर अनेक वर्ष ऐकली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का रेखा आणि जया यादेखील एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड्स होत्या.
advertisement
जया आणि रेखा एकमेकींच्या घरी जायच्या. दोघींनी एकमेकींबरोबर खूप चांगला वेळ घालवला आहे. रेखा आणि अमिताभ यांच्या प्रेमाचा सिलसिला सगळ्यांना माहितीये पण जया आणि रेखा यांच्यातील दोस्ताना फार कमी लोकांना माहिती आहे.
advertisement
यासर उस्मान यांच्या Rekha: The Untold Story या पुस्तकात जया आणि रेखा या दोघींच्या मैत्रीचा उल्लेख आहे.
advertisement
पुस्तकानुसार, रेखा आणि जया एकाच अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. त्या एकमेकींच्या शेजारणी होत्या. तेव्हाच जयाच्याच घरात रेखाची अमिताभ यांच्याशी पहिली भेट झाली होती.
advertisement
पुस्तकात असंही लिहिलं आहे की, रेखा जया यांना कधीच नावाने हात मारत नव्हत्या. ती नेहमीच त्यांना दीदी भाई म्हणून हाक मारायची.
advertisement
दोघी एकमेकींच्या घरी वारंवार ये-जा करायच्या आणि एकत्र वेळ घालवायच्या. त्या काळात त्यांचं नातं बहिणीसारखं घट्ट झालं होतं.
advertisement
रेखा सिनेमात काम करू लागली. तिची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि 1972 साली तिने मुंबईत तिचा पहिला फ्लॅट विकत घेतला.
advertisement
ती अजिंठा हॉटेलमधून जुहू येथील एका सेंट्रल अपार्टमेंटमध्ये राहायला आली. जिथे जया बच्चन आधीपासून राहत होत्या. याच काळात दोघींची मैत्री झाली.
advertisement