Yashasvi Jaiswal : 'करवा चौथ'ला ठोकलं शतक, त्यानंतर यशस्वीचं गर्लफ्रेंडसाठी खास सेलिब्रेशन, कोण आहे ती?

Last Updated:

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वालने धमाकेदार शतक झळकावलं. जयस्वालचं टेस्ट क्रिकेटमधलं हे सातवं शतक होतं.

'करवा चौथ'ला ठोकलं शतक, त्यानंतर यशस्वीचं गर्लफ्रेंडसाठी खास सेलिब्रेशन, कोण आहे ती?
'करवा चौथ'ला ठोकलं शतक, त्यानंतर यशस्वीचं गर्लफ्रेंडसाठी खास सेलिब्रेशन, कोण आहे ती?
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वालने धमाकेदार शतक झळकावलं. जयस्वालचं टेस्ट क्रिकेटमधलं हे सातवं शतक होतं. या शतकानंतर जयस्वालने केलेल्या सेलिब्रेशनची चर्चा सुरू आहे. शतक केल्यानंतर जयस्वालने त्याची बॅट, ग्लोव्हज आणि हेल्मेट जमिनीवर ठेवलं आणि हाताने हृदय बनवलं, यानंतर त्याने स्टेडियमकडे इशारा केला. करवा चौथच्या दिवशी जयस्वालने केलेल्या या इशाऱ्यामुळे जयस्वालच्या या सेलिब्रेशनची चर्चा जास्तच रंगू लागली. जयस्वालने हे सेलिब्रेशन त्याच्या प्रेयसीसाठी केल्याचं बोललं जात आहे.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या लंचनंतर जयस्वालने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. जयस्वालला त्याचं अर्धशतक पूर्ण करायला 82 बॉल लागले, यानंतर त्याने 145 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं.

जयस्वालने कोणासाठी 'हृदय' बनवले?

भारतीय क्रिकेट स्टार यशस्वी जयस्वालचं नाव मॅडी हॅमिल्टनशी जोडलेला आहे. टीम इंडियाचा हा ओपनर मॅडीच्या कुटुंबाच्याही जवळचा आहे. 2022 मध्ये, त्याने सोशल मीडियावर मॅडीच्या भावासोबतच आणि तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत एक फोटो शेअर केला. तेव्हापासून मॅडी यशस्वीची टीम इंडिया आणि आयपीएलची बॅटिंग बघायला येते. इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर आली होती, तेव्हा जयस्वालने दोन द्विशतके ठोकली होती, तेव्हाही मॅडी स्टँडमध्ये दिसली होती. मॅडी हॅमिल्टन ही ब्रिटीश नागरिक आहे.
advertisement
मॅडी हॅमिल्टन आयपीएल दरम्यान राजस्थान रॉयल्सची जर्सी घालूनही दिसली होती. यशस्वी जयस्वाल कधीही त्यांच्या नात्याबद्दल बोललेला नाही. जयस्वालला त्याच्या नात्याबद्दल प्रश्नही विचारण्यात आला, पण त्याने या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Yashasvi Jaiswal : 'करवा चौथ'ला ठोकलं शतक, त्यानंतर यशस्वीचं गर्लफ्रेंडसाठी खास सेलिब्रेशन, कोण आहे ती?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement