Weather Alert : महाराष्ट्रातून आता पावसाची एक्झिट, पण येणार नवं संकट, हवामान खात्याकडून अपडेट!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
राज्यात पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी बहुतांश भागांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
राज्यात पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी बहुतांश भागांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर काही प्रमुख शहरांतील तापमानात घट दिसून येत असल्याने थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. पाहुयात 11 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये 11 ऑक्टोबर रोजी कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. मुंबईत किमान तापमान 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस इतके नोंदवले जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
advertisement
advertisement
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत कोरडे हवामान राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील तापमान 17 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या भागात सकाळच्या सुमारास हलका थंडावा जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement









