Rohit sharma : एकीच मारा,लेकीने सॉलिड मारा... रोहित शर्माने फोडली 5 कोटीची लॅम्बोर्गिनी? पाहा VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रोहित शर्मा दादरच्या शिवाजी पार्कच्या मैदानावर प्रॅक्टीस करताना दिसला होता. या प्रॅक्टीस दरम्यान रोहित शर्माने एक गगनचुंबी षटकार मारला होता.हा षटकार जाऊन थेट लॅम्बोर्गिनीवर जाऊन आदळला होता.
Rohit Sharma Video : टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. या दौऱ्यात जाण्यापुर्वी आज रोहित शर्मा दादरच्या शिवाजी पार्कच्या मैदानावर प्रॅक्टीस करताना दिसला होता. या प्रॅक्टीस दरम्यान रोहित शर्माने एक गगनचुंबी षटकार मारला होता.हा षटकार जाऊन थेट लॅम्बोर्गिनीवर जाऊन आदळला होता. या संदर्भातला व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
रोहित शर्मा आज त्याचा माजी मुंबई संघातील सहकारी अभिषेक नायरसोबत शिवाजी पार्कच्या मैदानावर पोहोचला होता.यावेळी त्याने मैदानावर अनेक तास सराव केला होता. रोहितचा हा सराव सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.या संदर्भातले व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत.
Rohit Sharma’s sweep shot ended up breaking his own Lamborghini Urus.😭😂
pic.twitter.com/wamJxPFirV
— Rohan💫 (@rohann__45) October 10, 2025
advertisement
रोहित शर्माने यावेळी मैदानावर वेगवान गोलंदाजांविरुद्ध अचूक वेळेसह त्याचे सिग्नेचर पुल आणि कट शॉट्स दाखवले.शिवाजी पार्कवर त्याच्या सराव सत्रादरम्यान तो आक्रमक इनसाइड-आउट ड्राईव्ह देखील करताना दिसला. रोहित तिथेच थांबला नाही; त्याने फिरकी गोलंदाजांविरुद्धही सराव केला, स्वीप आणि स्लॉग स्वीपवर लक्ष केंद्रित केले.
दरम्यान रोहित शर्माने यावेळी एक स्वीप शॉर्ट खेळला.त्यावेळी बॉल डायरेक्ट मैदानाबाहेर गेला आणि एका गाडीवर आपटला होता.असा दावा काही चाहत्यांनी व्हायरल व्हिडिओत केला आहे तसेच ही गाडी रोहित शर्माचीच असल्याच चाहते व्हिडिओत सांगत आहे. आता रोहित शर्माकडे देखील भगव्या कलरची लॅम्बोर्गिनी कार आहे. या कारची किंमत 4.57 करोड आहे.त्यामुळे जर चाहत्यांच्या म्हणण्यांनुसार जर कारला बॉल लागला आहे, तर रोहितचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान 38 वर्षीय रोहितने यावर्षी फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. 2024 मध्ये अमेरिकेत झालेल्या टी20 विश्वचषक विजयानंतर संघाला सलग दुसऱ्यांदा आयसीसी जेतेपद मिळवून दिले. आता शुभमन गिलच्या जागी भारताचा एकदिवसीय कर्णधार म्हणून निवडण्यात आलेला रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन करेल, जो 19ऑक्टोबरपासून पर्थमध्ये सुरू होईल.
advertisement
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर
advertisement
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
वनडे मालिका
१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ
२३ ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड
२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2025 9:18 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit sharma : एकीच मारा,लेकीने सॉलिड मारा... रोहित शर्माने फोडली 5 कोटीची लॅम्बोर्गिनी? पाहा VIDEO