२० हजार मतदान बाहेरून आणल्याची भुमरेंची उघड कबुली, सारवासारव करीत एकनाथ शिंदे म्हणाले...

Last Updated:

प्रसंगावधान ठेवून एकनाथ शिंदे यांनी सावरून घ्यायला सांगितल्यानंतर भुमरे यांनी कोलांटउडी मारली खरी पण तरीही एकनाथ शिंदे यांना यावर स्पष्टीकरण द्यावे लागले.

एकनाथ शिंदे-विलास भुमरे
एकनाथ शिंदे-विलास भुमरे
अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत २० हजार मतदान बाहेरून आणल्याचा थेट कबुली शिवसेना आमदार विलास भुमरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत दिली. राज्यसह देशभरात मतचोरीचा मुद्दा गाजत असताना आणि त्यावरून निवडणूक आयोगही टीकेच्या केंद्रस्थानी असताना थेट अफरातफरीची कबुलीच विलास भुमरे यांनी दिल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली. प्रसंगावधान ठेवून एकनाथ शिंदे यांनी सावरून घ्यायला सांगितल्यानंतर भुमरे यांनी कोलांटउडी मारली खरी पण तरीही एकनाथ शिंदे यांना यावर स्पष्टीकरण द्यावे लागले.
विलास भुमरे यांनी विधानसभा निवडणुकीला स्थलांतरित मतदारांना मतदारसंघात आणल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यांनीच यावर व्यवस्थित स्पष्टीकरण दिले आहे, त्यांनी शेतकऱ्यांना मदत केल्याचा बातम्या माध्यमांनी सकारात्मकपणे दाखवाव्यात, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला. भुमरे यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना शिंदे यांना सारवासारव करावी लागली.

विलास भुमरेंच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांनाच सल्ला

शेतकरी आत्महत्या झाल्या त्यालेळी विलास भुमरे यांनी एक लाखाची मदत दिली. माध्यमांनी त्या बातमी लावाव्यात, असा सल्ला देताना २० हजार मतदारांचा खुलासा भुमरे यांनी लगोलग केला. त्यांच्या मतदार संघाच्या बाहेर जी नावे गेलेली आहे ती त्यांनी आणली, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. माध्यमांनी चांगल्या बातम्या दाखवाव्यात, माध्यमे चांगल्या बातम्या दाखवत नाहीत. उद्धव ठाकरे सेनेचे लोक आले होते, कोणतीही मदत त्यांनी केली नाही. तिथे आमचे विलास भुमरे गेले, त्यांनी कुटुंबाला मदत केली. बांधिलकी जपणाऱ्या माणसासोबत तरी असे करू नका, असा सल्ला शिंदे यांनी माध्यमांना दिला.
advertisement

विलास भुमरे काय म्हणाले होते?

पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांनी भाषणात बोलताना विधानसभा निवडणुकीत २० हजार मतदान बाहेरून आणले असे सांगितले. मात्र मंचावर बसलेल्या एकनाथ शिंदे यांनी इशारा करताच लागलीच सुधारणा करत मतदान बाहेरून आणले म्हणजेच स्थलांतरित मतदार होते, त्यांना मतदान करण्यासाठी विधानसभेच्या वेळेस आणले असा खुलासा त्यांनी लगोलग केला. विलास भुमरे यांच्या टायमिंगने सभागृहात एकच हशा पिकला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
२० हजार मतदान बाहेरून आणल्याची भुमरेंची उघड कबुली, सारवासारव करीत एकनाथ शिंदे म्हणाले...
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement