खूप वाईट काळ अनुभवला! आता 1 जानेवारी 2026 पासून या राशींचा गोल्डन टाइम सुरू होणार, सुखशांती पैसा येणार

Last Updated:
Astrology News : 2025 हे वर्ष आता शेवटच्या टप्प्यात आले असून अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे नवीन वर्ष 2026 कसे असेल, याबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
1/6
Astrology News
2025 हे वर्ष आता शेवटच्या टप्प्यात आले असून अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे नवीन वर्ष 2026 कसे असेल, याबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. विशेषतः नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी कसा जाईल, कोणासाठी तो भाग्यवर्धक ठरेल, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावर तसेच ज्योतिष तज्ज्ञांकडून 2026 बाबत विविध भाकिते व्यक्त केली जात आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, 2026 च्या नववर्षाचा पहिला दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरणार आहे.
advertisement
2/6
astrology
ज्योतिष गणनेनुसार, 1 जानेवारी 2026 रोजी चंद्र वृषभ राशीत तर सूर्य धनु राशीत विराजमान असेल. या दिवशी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून रोहिणी नक्षत्र आणि शुभ योगाचा संयोग लाभणार आहे. विशेष म्हणजे, सूर्य आणि बुध हे दोन्ही ग्रह धनु राशीत एकत्र येणार असल्याने बुधादित्य योग तयार होणार आहे. याशिवाय चतुर्ग्रही योगाचाही प्रभाव राहील. हे सर्व ग्रहयोग एकत्र आल्याने 2026 चा पहिला दिवस अत्यंत सकारात्मक ऊर्जा देणारा मानला जात आहे. मात्र, या दिवशी 12 पैकी तीन राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
advertisement
3/6
मेष
मेष -  मेष राशीच्या लोकांसाठी 1 जानेवारी 2026 हा दिवस आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत अनुकूल ठरणार आहे. या दिवशी उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे असून मालमत्ता, घर, फ्लॅट, प्लॉट किंवा वाहन खरेदीचे योग जुळून येऊ शकतात. केलेली गुंतवणूक भविष्यात लाभदायक ठरेल. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील, तर व्यवसायात असलेल्यांना चांगले करार किंवा लाभदायक प्रस्ताव मिळू शकतात. पदोन्नती, प्रतिष्ठेत वाढ आणि नवीन ओळखी निर्माण होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण सुखकर राहील आणि आर्थिक स्थैर्य मिळाल्याने मनःशांती लाभेल. कर्जातून मुक्त होण्याचा किंवा नवीन सुरुवात करण्याचा निर्णयही या दिवशी घेतला जाऊ शकतो.
advertisement
4/6
कन्या
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. विवाह इच्छुक किंवा विवाह रखडलेल्या लोकांना योग्य स्थळ मिळण्याची दाट शक्यता आहे. अविवाहितांना प्रेमसंबंध जुळण्याचे योग असून एखाद्या खास व्यक्तीशी भेट घडू शकते. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, तर बेरोजगारांसाठी नोकरीची संधी निर्माण होऊ शकते. व्यवसायात नफा, न्यायालयीन प्रकरणांत दिलासा आणि आरोग्यात सुधारणा दिसून येईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस योग्य ठरू शकतो.
advertisement
5/6
मकर
मकर - मकर राशीच्या लोकांसाठीही 2026 ची सुरुवात उत्साहवर्धक ठरणार आहे. परदेश प्रवास, परदेशातील शिक्षण किंवा नोकरीसंबंधी शुभ बातमी मिळू शकते. मान-सन्मान, यश आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहेत. विवाह ठरणे, नवीन वाहन किंवा घर खरेदीचे योग जुळून येऊ शकतात. बँक बॅलन्स वाढेल, खर्चावर नियंत्रण राहील आणि बचतीकडे अधिक लक्ष देता येईल. धार्मिक किंवा आध्यात्मिक उपक्रमांत सहभागी होऊन वर्षाची सुरुवात केल्यास मनःशांती आणि सकारात्मकता लाभेल. एकूणच, 1 जानेवारी 2026 हा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी समृद्धी आणि प्रगती घेऊन येणारा ठरेल.
advertisement
6/6
astrology news
<strong>(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही) </strong>
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement