मनोज बाजपेयी, पंकज त्रिपाठी ते जयदीप अहलावत, 2025 मध्ये या स्टार्सनी गाजवलं OTT
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
OTT Stars : 2025 मध्ये पाच कलाकार ओटीटी गाजवताना दिसून आले आहेत. यात मनोज बाजपेयी ते पंकज त्रिपाठीपर्यंत अनेकांचा समावेश आहे.
advertisement
advertisement
जयदीप अहलावत : जयदीप अहलावत हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. यावर्षी त्याच्या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यात 'पाताल लोक 2' आणि 'फॅमिली मॅन 3' या सीरिजचा समावेश आहे. यात त्याचा अप्रतिम अभिनय पाहायला मिळेल. 'पाताल लोक 2'मध्ये पाच वर्षांनंतर त्याने कठोर आणि सनकी पोलीस अधिकारी हातीराम चौधरीच्या भूमिकेत कमबॅक केलं आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तर 'फॅमिली मॅन 3' मध्ये तो मनोज बाजपेयीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला. त्याने प्राइम व्हिडिओच्या ब्लॉकबस्टर फ्रँचायझीतील नव्या खलनायक रुकमाची भूमिका साकारली. हातीरामपेक्षा पूर्णपणे वेगळ्या रुकमाच्या भूमिकेत अहलावतने आपल्या अभिनय कौशल्याचा आणि प्रत्येक फ्रेमवर वर्चस्व गाजवण्याच्या क्षमतेचा प्रभावी दाखला दिला.
advertisement
मनोज बायपेयी : मनोज बाजपेयी हे सिनेसृष्टीतील सुपरस्टार आहेत आणि मोठ्या पडद्यावर त्यांची छाप कायम आहे. तरीही त्यांनी ओटीटीवर एक सुपरहिट सीरिज दिली आणि आजही त्यासाठी त्याला भरपूर प्रशंसा मिळते. पोलीस असोत किंवा गुन्हेगार, मनोज बाजपेयी प्रत्येक भूमिकेत एक वेगळी आणि प्रामाणिक छाप उमटवतात. जरी ते प्रामुख्याने पोलीस भूमिकांसाठी ओळखले जात असले, तरी प्रत्येक पात्राला ते स्वतंत्र व्यक्तिमत्त्व देतात. नवोदित दिग्दर्शक चिन्मय मंडलेकर दिग्दर्शित अनोख्या क्राइम ड्रामा इन्स्पेक्टर झेंडे मध्ये बाजपेयी यांनी मुंबईचे माजी पोलीस अधिकारी मधुकर बी. झेंडे यांची भूमिका साकारली आहे. ज्यांनी सीरियल किलर चार्ल्स शोभराजला दोन वेळा अटक केली होती.
advertisement
पंकज त्रिपाठी : पंकज त्रिपाठी आपल्या लोकप्रिय कोर्टरूम ड्रामा 'क्रिमिनल जस्टिस 4' मध्ये पुन्हा एकदा सर्वांचा लाडका वकील माधव मिश्रा म्हणून दिसले. आपल्या अप्रतिम विनोदबुद्धी आणि दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांना खोटेपणा, कौटुंबिक रहस्ये आणि कोर्टरूम ड्रामाच्या गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकवले आहे.
advertisement
सान्या मल्होत्रा : ZEE5 वर प्रदर्शित झाल्यानंतर 'मिसेस' या चित्रपटाला देशभरातून मोठ्या प्रमाणावर दाद मिळाली. सान्या मल्होत्राने ऋचा ही भूमिका साकारली आहे. ऋचा ही अरेंज मॅरेजमधील नवविवाहित स्त्री असून पतीच्या घरी प्रवेश केल्यानंतर स्वतःला केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित असल्याचे अनुभवते. तिच्या प्रभावी आणि सशक्त अभिनयाने पितृसत्ताक अपेक्षांना आव्हान दिले आणि प्रेक्षकांना लैंगिक भूमिका व सामाजिक संकेतांवर विचार करायला प्रवृत्त केले.
advertisement
लक्ष्य : धाडसी कथा आणि ताऱ्यांनी सजलेल्या कलाकारवर्गामुळे आर्यन खानची 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही सीरिज प्रत्येक अर्थाने प्रचंड चर्चेत राहिली. जिथे प्रत्येक पात्राने आपापल्या वेगळ्या पैलूंनी आणि आश्चर्यांनी लक्ष वेधले. तिथे लक्ष्यने आपल्या तरुण ऊर्जेने, भावनिक तीव्रतेने आणि करिश्माई स्क्रीन प्रेझेन्सने शोला पुढे नेले.








