Pune Crime : गाडीचा अपघात झालाय म्हणत थांबवलं; मग धक्कादायक कांड, पुण्यात चोरट्यांची नवी शक्कल
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
गाडीचा अपघात झाला आहे, अशी बतावणी करत चोरट्यांनी कार चालकाला रस्त्यात थांबवले. चालक काही समजण्याच्या आतच चोरट्यांनी त्याला लुटलं
पुणे : पुणे शहर आणि परिसरात लूटमारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. चोरट्यांनी सर्वसामान्यांना लुटण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधल्या आहेत. सिंहगड रस्ता, पर्वती आणि येरवडा या भागात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
किरकटवाडीत 'अपघाताचा' बनाव रचून ३ लाखांची लूट
सिंहगड रोडवरील किरकटवाडी परिसरात चोरट्यांनी एका कार चालकाला लुटण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. गाडीचा अपघात झाला आहे, अशी बतावणी करत चोरट्यांनी कार चालकाला रस्त्यात थांबवले. चालक काही समजण्याच्या आतच चोरट्यांनी त्याला धाक दाखवून त्याच्या गळ्यातील ३ लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
advertisement
पर्वती परिसरात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ
दुसरी घटना सिंहगड रस्त्यावरील पर्वती जलशुद्धीकरण केंद्राजवळ घडली. १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:१५ च्या सुमारास धायरी येथील एक तरुण या भागातून जात असताना चोरट्यांनी त्याला गाठले. धमकावून त्याच्याकडील महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार झाले. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक महाले हे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा माग काढत आहेत.
advertisement
येरवड्यात कार चालकाला बेदम मारहाण करत लुटले
view commentsयेरवडा परिसरातही लूटमारीचा थरार पाहायला मिळाला. १९ डिसेंबर रोजी सायंकाळी नगर रस्ता भागात थांबलेल्या एका कार चालकाला चोरट्यांच्या टोळीने घेरले. चोरट्यांनी चालकाला बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडील १२ हजारांची रोकड, मोबाईल आणि मनगटी घड्याळ असा एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज लुटला. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 7:17 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : गाडीचा अपघात झालाय म्हणत थांबवलं; मग धक्कादायक कांड, पुण्यात चोरट्यांची नवी शक्कल








