खाकीचं स्वप्न अधुरं, 3 चाकांवर उभी केली आयुष्याची गाडी, महिलांना मोफत रिक्षा चालवण्याचे अनिता देतात प्रशिक्षण
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
गेल्या 30 वर्षांपासून रिक्षा चालवून अनिता राजू कटकुरे या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. तसेच त्यांच्या मुलांचे शिक्षण देखील रिक्षा चालवूनच त्या पूर्ण करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गेल्या 30 वर्षांपासून रिक्षा चालवून अनिता राजू कटकुरे या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. तसेच त्यांच्या मुलांचे शिक्षण देखील रिक्षा चालवूनच त्या पूर्ण करत आहेत. त्यांचे पती राजू कटकुरे हे वारलेले आहे, तसेच आई-वडील नाही. पोलीस होण्याचे स्वप्न त्यांचे होते परंतु ते परिस्थितीमुळे पूर्ण झाले नाही, म्हणून त्यांनी रिक्षाचालकाची वर्दी घातली. विशेषतः कटकुरे या महिलांना ऑटो रिक्षा चालवण्याचे मोफत प्रशिक्षण सुद्धा देत आहे, आतापर्यंत त्यांनी जवळपास 10 ते 15 महिलांना ऑटो रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवले आहे.
रिक्षाचालक अनिता कटकुरे लोकल 18 सोबत बोलताना सांगतात की, रिक्षा घेण्याअगोदर पोलीस प्रशासनातील अधिकारी यांच्या घरी धुणी-भांडी करण्याचे मी काम करत होते. खाकी वर्दी अंगावर घालण्याची खूप इच्छा असल्यामुळे अधिकारी तरडे म्हणाले की, तुम्ही चौथी पास करा, पोलीसमध्ये लावून देतो.
advertisement
त्यानंतर चौथी पास केली आणि पोलीस होण्यासाठी सातवी पासचा नियम आला. त्यामुळे पोलीस होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले, त्यानंतर रिक्षाचालकाचे काम शिकले, परवाना काढण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केले आणि तेव्हापासून संसाराचा गाडा चालवण्यासाठी तीन चाके चालवणे सुरू केले.
रिक्षा चालवून कमाई जास्त नाही पण उदरनिर्वाह होतो, दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतः रिक्षा चालवणे किंवा व्यवसाय करणे कधीही चांगले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील कोणत्याही ठिकाणचे किराया आला तर जावे लागते, जालना, परभणी, बीड तसेच रुग्णांना दवाखान्यात ने-आण करणे, अशी कामे करत असल्याचे देखील कटकुरे यांनी सांगितले आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 10, 2025 9:30 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
खाकीचं स्वप्न अधुरं, 3 चाकांवर उभी केली आयुष्याची गाडी, महिलांना मोफत रिक्षा चालवण्याचे अनिता देतात प्रशिक्षण