'6 महिन्यातच मला कळलं होतं की...' शारिरीक छळ, मानसिक आघात; लग्नानंतर मयुरी वाघची झाली होती भयंकर अवस्था
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Mayuri Wagh divorce : घटस्फोटाच्या अनेक वर्षांनंतर मयुरीने पहिल्यांदाच तिच्या आयुष्यातील त्या कठीण काळातल्या वेदना उघडपणे व्यक्त केल्या आहेत.
मुंबई: मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी वाघ आणि अभिनेता पियुष रानडे यांच्या लग्नाचा आणि घटस्फोटाचा विषय अनेक वर्षांनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
advertisement
'अस्मिता' मालिकेच्या सेटवर झालेली मैत्री आणि त्यानंतर झालेलं प्रेम दोन वर्षांतच संपले. आता घटस्फोटाच्या अनेक वर्षांनंतर मयुरीने पहिल्यांदाच तिच्या आयुष्यातील त्या कठीण काळातल्या वेदना उघडपणे व्यक्त केल्या आहेत.
advertisement
मयुरी वाघने नुकतीच सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. लग्नाबद्दल बोलताना ती म्हणाली, "मला आता कोणत्याच गोष्टीचा पश्चात्ताप नाहीये. पण, मी लग्नाचा निर्णय खूप लवकर घेतला असं मला वाटतं."
advertisement
आजकालच्या मुली लग्नाआधी मुलाचा पगार, घर, कुटुंबातील गोष्टी बघून खूप विचार करतात; पण माझ्या बाबतीत तसे झाले नाही. "तो एक प्रवाह होता आणि त्यातच मी लग्नाचा निर्णय घेतला. माझ्या आई-वडिलांनीही मला पाठिंबा दिला, पण त्यांना कदाचित त्यावेळी हे पटले नसेल," असे मयुरीने सांगितले.
advertisement
मयुरीने हा धक्कादायक खुलासा केला की, सहा महिन्यांतच तिला जाणवले होते की, आपला लग्नाचा निर्णय चुकला आहे. पण, तिला ते स्वीकारायला खूप वेळ लागला. "माझ्या आई-बाबांना ४ महिन्यांत समजले होते की, हे सगळं चुकलंय. पण, ही गोष्ट मला समजायला जवळजवळ दीड वर्षे लागली."
advertisement
ती भावूक होत म्हणाली, "ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला, ती व्यक्ती हे करू शकत नाही, हे समजायला मला खूप वेळ लागला."
advertisement
या कठीण काळात मयुरी 'ती फुलराणी' नाटकाचे शूटिंग करत होती. सेटवरच्या सहकलाकारांनाही तिच्या आयुष्यात काहीतरी गडबड सुरू असल्याचे जाणवत होते.
advertisement
मयुरी म्हणाली, "मी खूप डिस्टर्ब असायचे. सीन संपला की माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे, हे त्यांना दिसायचं. अनेकदा पहाटे दोन-तीन ते चार वाजेपर्यंत ते सगळे माझ्यासाठी थांबायचे, कारण तेव्हा मला झोप लागायची नाही."
advertisement
याच मुलाखतीत मयुरीला पियुषसोबतच्या लग्नामध्ये शारीरिक छळ झाला होता का, असे विचारले असता, तिने 'हो' असे उत्तर दिले. कोरोना काळात ती एकटी राहायची, तेव्हा तिच्या आईला तिची खूप काळजी वाटायची.
advertisement
"ह्या सगळ्या विचारातून बाहेर पडायला मला सहा महिने लागले. मी घरात मासे आणून ठेवले होते आणि त्यांच्याशी बोलायची, कारण मी आई-वडिलांना काही सांगू शकत नव्हते," असे सांगत तिने तिच्या एकटेपणाचा अनुभव सांगितला. शेवटी ती असंही म्हणाली, "जेव्हा मला रिअ‍ॅलिटी चेक मिळाला, तेव्हा मी ठरवलं आता कुणावर विश्वास ठेवायचा नाही."