चीनसाठी काळी रात्र, तैवानने उचललं जग हलवणार पाऊल; सर्वात शक्तिशाली डिफेन्स वॉल हवेतच उडवणार मिसाईल्स
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Taiwan VS China : चीनच्या वाढत्या लष्करी दबावाला प्रत्युत्तर म्हणून तैवानने ‘Iron Dome’च्या धर्तीवर स्वतःची ‘T-Dome’ एअर डिफेन्स सिस्टीम उभारण्याची घोषणा केली आहे. ही प्रणाली हवेतच शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा नाश करेल आणि आशियात चीनविरुद्ध तैवानचं सर्वात मोठं सुरक्षा कवच ठरणार आहे.
तायपेई : चीनकडून वाढत्या लष्करी धोक्यांच्या पार्श्वभूमीवर तैवानने आपल्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल उचललं आहे. इस्रायलच्या प्रसिद्ध ‘Iron Dome’ प्रणालीच्या धर्तीवर तैवान आता स्वतःची ‘T-Dome’ नावाची नवी एअर डिफेन्स वॉल उभारणार आहे. ही प्रणाली शत्रूच्या क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करण्याची क्षमता ठेवेल. तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते (Lai Ching-te) यांनी राष्ट्रीय दिनाच्या भाषणात ही घोषणा केली आणि सांगितले की, देश आता ‘मल्टी-लेयर्ड एअर डिफेन्स सिस्टम’ उभारणार आहे जी शत्रूच्या प्रत्येक स्तरावरील हल्ल्यांना प्रत्युत्तर देऊ शकेल.
advertisement
आम्ही ‘T-Dome’ चं बांधकाम वेगाने पूर्ण करू, जेणेकरून देशात एक मजबूत आणि सशक्त हवाई संरक्षण प्रणाली उभी राहील. यात हाय-लेव्हल डिटेक्शन आणि प्रभावी इंटरसेप्शन दोन्ही तंत्रज्ञान असतील, असे लाई म्हणाले. तैवान आता शक्तीद्वारे शांतता राखण्यास तयार आहे आणि चीनला इशारा दिला की, तैवानची स्थिती बदलण्यासाठी दबाव किंवा बलप्रयोगाचा वापर करू नये.
advertisement
नवे सुरक्षा कवच
राष्ट्राध्यक्ष लाई यांनी सांगितले की- तैवान आता आपल्या GDP चा 3% भाग संरक्षणावर खर्च करेल आणि 2030 पर्यंत हा खर्च वाढवून 5% करण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत हाय-टेक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांच्या साहाय्याने एक स्मार्ट डिफेन्स सिस्टीम तयार केली जाईल, जी असिमेट्रिक स्ट्रॅटेजीला अधिक बळकटी देईल.
advertisement
जरी या प्रणालीच्या खर्चाबाबत आणि पूर्ण होण्याच्या कालमर्यादेबाबत राष्ट्राध्यक्षांनी कोणतीही माहिती दिली नाही, तरी संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा ‘T-Dome’ इस्रायलच्या Iron Dome प्रमाणेच डिझाईन केला जाणार आहे.
आशियाई अपग्रेडसह
advertisement
इस्रायलचा Iron Dome हा जगातील सर्वात प्रभावी हवाई संरक्षण यंत्रणांपैकी एक मानला जातो. तो 4 ते 70 किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या रॉकेट्स किंवा क्षेपणास्त्रांना इंटरसेप्ट करून हवेतच नष्ट करण्याची क्षमता ठेवतो. त्यातील रडार सिस्टीम incoming मिसाईलची दिशा आणि तिचा संभाव्य परिणाम ओळखते आणि फक्त तीच क्षेपणास्त्रे लक्ष्य करते जी लोकवस्तीच्या दिशेने येत असतात, तर उरलेल्यांना रिकाम्या भागात पडू देते.
advertisement
Iron Dome ने आजवर हजारो क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली आहेत आणि आता तैवान त्याच धर्तीवर स्वतःचा T-Dome Shield System उभारत आहे. जो चीनकडून येणाऱ्या कोणत्याही हवाई हल्ल्याला तत्काळ प्रत्युत्तर देईल.
एका वरिष्ठ तैवानी अधिकाऱ्याने सांगितले की- आम्ही एक अधिक शक्तिशाली आणि उच्च इंटरसेप्शन दर असलेली संरक्षण प्रणाली तयार करत आहोत. अमेरिका देखील ‘Golden Dome’ नावाची अशीच प्रणाली उभारत आहे. ज्याची किंमत सुमारे 175 अब्ज डॉलर असेल आणि जी अवकाशातून येणाऱ्या क्षेपणास्त्रांनाही पाडू शकेल.
advertisement
अजून दूरची गोष्ट
जरी ही घोषणा तैवानसाठी मोठं पाऊल मानली जात असली, तरी अनेक तज्ज्ञांच्या मते ‘T-Dome’ प्रत्यक्ष उभारणीसाठी अजून बराच वेळ लागेल. तैवानच्या नॅशनल चेंग कुंग युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक हंग-जन वांग यांनी सांगितले की- जर हा प्रकल्प इस्रायलच्या धर्तीवर केला गेला, तर त्याची किंमत खूप मोठी असेल. हे सहज शक्य होणार नाही.
T-Dome चे बांधकाम राष्ट्राध्यक्ष लाई यांच्या कार्यकाळात पूर्ण होणं अशक्य आहे. ही घोषणा प्रत्यक्षात अमेरिकेला एक स्ट्रॅटेजिक सिग्नल देण्यासाठीच केली गेली आहे, असे अमेरिकेच्या सॅम ह्यूस्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डेनिस वेंग यांनी म्हटले आहे.
चीनच्या धोक्यांमुळेच...
चीन सातत्याने तैवानवर दबाव वाढवत आहे. बीजिंग तैपेईला आपला अविभाज्य भाग मानते आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग अनेकदा म्हणाले आहेत की- चीनचे पुनर्रएकीकरण कोणीही रोखू शकत नाही. दुसरीकडे तैवानचा ठाम दावा आहे की, त्याच्या 2.3 कोटी नागरिकांनाच त्यांच्या भविष्यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार आहे. एप्रिल महिन्यात चीनने तैवानच्या चारही बाजूंनी मोठे लष्करी सराव (military drills) केले आणि तैवान सरकारला “सेपरेटिस्ट” म्हणून घोषित केले.
अमेरिकेने व्यक्त केली चिंता
अमेरिकेचे डिफेन्स सेक्रेटरी पीट हगसेथ यांनी म्हटले होते की, चीनचा तैवानवरील हल्ला ‘इमीनेन्ट’ (तातडीचा) असू शकतो. तर इंडो-पॅसिफिक कमांडर अॅडमिरल सॅम्युअल पापारो यांनी चेतावणी दिली की, चीनचे सैनिकी सराव हे ड्रिल्स नाहीत, तर प्रत्यक्ष हल्ल्याची तयारी आहेत.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार चीन आता ‘हायब्रिड वॉरफेअर’ वापरत आहे. म्हणजेच ऑनलाइन चुकीची माहिती, सायबर अटॅक्स आणि रोजच्या ‘ग्रे झोन’ छळाच्या तंत्रांचा वापर करून तैवानला अस्थिर करण्याचा प्रयत्न. चीनचा उद्देश आमच्या सैन्य आणि नागरिकांचा आत्मविश्वास खच्चीकरणे आणि आपल्या हल्ल्याच्या क्षमतेची चाचणी घेणे हा आहे.
चीनचा संताप
राष्ट्राध्यक्ष लाई यांचे भाषण सत्याला वाकवण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी इतिहास आणि आंतरराष्ट्रीय सहमतीला आव्हान दिलं आहे. तैवानच्या स्वातंत्र्याबाबत बोलून ते जाणूनबुजून उकसवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी म्हटलं आहे. बीजिंगने लाई यांना “ट्रबलमेकर” आणि “वॉर्मेकर” अशी विशेषणं देत इशारा दिला आहे की- जर तैवानने संरक्षण वाढवलं, तर चीन देखील त्यावर ‘योग्य प्रतिक्रिया’ देईल.
तज्ज्ञांच्या मते, “T-Dome” हा तैवानचा सर्वात महत्त्वाकांक्षी सुरक्षा प्रकल्प ठरू शकतो. चीनच्या वाढत्या आक्रमकतेला आणि तैवानच्या स्वातंत्र्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद म्हणून हा आशियाई आयर्न डोम म्हणजेच तैवानचं नवं सुरक्षा कवच तैवानसाठी “डिफेन्स डिटेरन्स” आणि राजकीय संदेश या दोन्ही भूमिका पार पाडेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2025 10:04 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
चीनसाठी काळी रात्र, तैवानने उचललं जग हलवणार पाऊल; सर्वात शक्तिशाली डिफेन्स वॉल हवेतच उडवणार मिसाईल्स