पहिल्या दिवशी 9 रुपयांचा गल्ला, आज आहे कोटींचा बिजनेस, पुण्यातील खत्री बंधूंबाबत माहितीये का?

Last Updated:

शून्यातून विश्व निर्माण करणारा यशस्वी उद्योजक नेमका कसा असावा? याचा आदर्श पुण्यातील गिरीश खत्री यांनी घालून दिला आहे.

+
पहिल्या

पहिल्या दिवशी 9 रुपयांचा गल्ला, आज आहे कोटींचा बिजनेस, पुण्यातील खत्री बंधूंबाबत माहितीये का?

शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे: आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, संघर्ष आपल्याला जगायला शिकवतो आणि संघर्ष करत करत आपण एक दिवस सामर्थ्यवाण बनतो. आजची कहाणी अगदी तशीच आहे. नवा व्यवसाय सुरू केला तेव्हा पहिल्या दिवसाचा गल्ला केवळ 9 रुपये होता आणि आज कोट्यवधींचं उद्योग विश्व निर्माण झालंय. पुण्यातील खत्री बंधू आईस्क्रीम वाल्यांची ही कहाणी नव्याने व्यवसायात उतरू पाहणाऱ्या युवकांना प्रेरणादायी ठरेल अशीच आहे.
advertisement
वडिलांना मदत म्हणून व्यवसाय
गिरीश खत्री यांनी 1989 साली आईस्क्रीमच्या व्यवसायात पदार्पण केले. एकत्र कुटूंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वडिलांना मदत करायची म्हणून गिरीश आईसक्रीम बनवायला शिकले. त्यांचे मामा देखील आईस्क्रीम बनवायचे. त्यामुळे त्यांना मामांचे मार्गर्शन मिळाले. आईच्या मदतीने पैशांची जुळवाजूळव करून त्यांनी हा व्यवसाय उभारला.
advertisement
पहिल्या दिवशी 9 रुपयांचा गल्ला
पहिल्या दिवशीची विक्री 9 रुपये होती. पण तरीही न डगमगता हा व्यवसाय सुरु ठेवला. 'माउथ पब्लिसिटी'मुळे लोकं जोडली गेली आणि वेगवेगळ्या ठिकाणांवरुन मागणी वाढली. पुढे त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी आउटलेट सुरु केले. आज पुण्यात 29 ठिकाणी आम्ही विक्री करतो तसेच पुण्याच्या बाहेरही पुरवठा करतो, असे खत्री बंधू आईस्क्रीमचे गिरीश खत्री सांगतात.
advertisement
ग्राहकांच्या सूचनांचा फायदा
पहिल्यांदा घराशेजारी विठ्ठल मंदिराच्या बाजूला व्यवसाय सुरू केला. पहिल्या दिवशीची आमची विक्री 9 रुपये होती, त्यानंतर ग्राहकांच्या सूचना येत गेल्या. त्याच आमच्यासाठी महत्त्वाच्या होत्या. त्यांची दखल घेत आम्ही बदल करत गेलो आणि आमचा एक फॉर्म्युला तयार झाला. हाच फॉर्म्युला आज लोकांना आवडत आहे, असं गिरीश सांगतात.
advertisement
कठोर परिश्रमांची तयारी आवश्यक
एखादा यशस्वी व्यवसायाचा मालक होण्यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक असते. परंतु त्यासोबतच वैयक्तिक गुण आणि व्यवसाय पद्धतीदेखील तितकीच महत्त्वाची असते. गिरीश खत्री यांनी मात्र अनेक वर्षांपासून या व्यवसायाची धुरा योग्य पद्धतीने सांभाळली आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारा यशस्वी उद्योजक नेमका कसा असावा याचा आदर्श त्यांनी सर्वांना घालून दिला आहे.
मराठी बातम्या/करिअर/
पहिल्या दिवशी 9 रुपयांचा गल्ला, आज आहे कोटींचा बिजनेस, पुण्यातील खत्री बंधूंबाबत माहितीये का?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement