Ola Uber आणि Rapido च्या मनमानीला आता ब्रेक, ड्रायव्हरचं काम शिफ्टनुसार, भाडेही नियमाप्रमाणेच! सरकारी मसुदा आला

Last Updated:

राज्य सरकारने या कंपन्यांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी ‘महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५’ कायदा आणणार असून मसुद्याची घोषणा केली आहे. 

News18
News18
मुंबई: महायुती सरकारने आता राज्यभरात खासगी वाहतूक कंपन्यांना आता नियम आणि अटीसह वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे.  राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५’ या मसुदा नियमांची घोषणा केली आहे. यामध्ये कारचालकाला आता दिवसभरात 12 तास काम करता येणार आहे. या नियमामुळे आता चालकांना १० तास विश्रांती मिळणार आहे.
ओला, उबर आणि रॅपिडो या खासगी कंपन्यांची कार आणि दुचाकी टॅक्सी सेवा मुंबई, पुण्यासह राज्यभरात सुरू आहे. या खासगी कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे अनेकवेळा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य सरकारने या कंपन्यांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी ‘महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५’ कायदा आणणार असून मसुद्याची घोषणा केली आहे.  हे नियम मोटर वाहन कायदा, १९८८ च्या कलम ७३, ७४ आणि ९३ अंतर्गत प्रस्तावित असून, १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत या हरकती आणि सूचना मागविण्या आल्या असून त्यानंतर  लागू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
advertisement
या नव्या नियमांमुळे ॲग्रीगेटर कंपन्या, चालक आणि प्रवासी यांच्यातील संबंध अधिक पारदर्शक होतील तसंच भाडे, सेवा गुणवत्ता, चालकांचे हक्क आणि प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत.
नियम यांना लागू होणार
हे नियम ई-रिक्षासह सर्व प्रवासी मोटार वाहनांच्या ॲग्रीगेटरना लागू होतील. म्हणजेच, ओला-उबरसारख्या कॅब सेवांसोबत ई-रिक्षा सेवा देखील या चौकटीत येतील. तसंच, बाईक-टॅक्सी सेवांसाठी स्वतंत्र “महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५” लागू राहतील आणि त्यासाठी वेगळा परवाना घ्यावा लागेल.
advertisement
परवाना शुल्क आणि सुरक्षा ठेव
राज्य परिवहन प्राधिकरण (प्रति जिल्हा) परवाना देण्यासाठी आता १०,००,००० रुपये परवाना नूतनीकरणासाठी २५,००० रुपये आकारले जातील.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (प्रति जिल्हा)
परवाना देण्यासाठी २,००,००० रुपये आणि परवाना नूतनीकरणासाठी ५,००० शुल्क आकारले जाणार आहे.
ॲग्रीगेटरला वाहनसंख्येप्रमाणे सुरक्षा ठेव
वाहनांची संख्या १०० बस किंवा १००० वाहनांपर्यंत- सुरक्षा ठेव – १० लाख रुपये असणार आहे.
advertisement
वाहनांची संख्या १००० बस किंवा १०,००० वाहनांपर्यंत – सुरक्षा ठेव – २५ लाख इतकी असेल.
वाहनांची संख्या १००० हून अधिक बस किंवा १०,००० हून अधिक वाहने सुरक्षा ठेव – ५० लाख जमा करावे लागतील.
भाड्याचे नियमन
सर्ज प्राइसिंग :  मागणी वाढल्यास ॲप भाडे वाढवू शकेल, परंतु ते प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठरवलेल्या मूळ भाड्याच्या दिड पटापेक्षा जास्त नसावे. मागणी कमी झाल्यासही भाडे मूळ दराच्या २५ टक्के पेक्षा कमी ठेवता येणार नाही.
advertisement
सुविधा शुल्क 
राइडरकडून आकारले जाणारे सुविधा शुल्क मूळ भाड्याच्या ५ टक्के पेक्षा जास्त नसावे, आणि एकूण कपात मूळ भाड्याच्या १० टक्के पेक्षा अधिक नसावी.
चालक आणि वाहनांवरील अटी
चालक एका दिवशी जास्तीत जास्त १२ तास ॲपवर लॉग-इन राहू शकतो. त्यानंतर किमान १० तासांची विश्रांती घ्यावी लागेल.
प्रशिक्षण
ॲग्रीगेटरकडे जोडण्यापूर्वी चालकांना ३० तासांचा प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करावा लागेल.
advertisement
रेटिंग व्यवस्था:
चालकाचे सरासरी रेटिंग पाचपैकी दोन स्टार्सपेक्षा कमी असल्यास त्याला सुधारात्मक प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तोपर्यंत ॲपवरून काढण्यात येईल.
विमा
प्रवाशांना ५ लाख रुपयांपर्यंतचा प्रवास विमा घेण्याचा पर्याय ॲपमध्ये अनिवार्यपणे उपलब्ध असावा.
वाहनाचे वय:
ऑटोरिक्षा व मोटारकॅब — नोंदणीपासून ९ वर्षांपेक्षा जास्त जुन्या नसाव्यात.
बस — ८ वर्षांपेक्षा जुनी नसावी.
ॲप आणि वेबसाइटच्या अटी
ॲप मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असावे. चालकाला राइड स्वीकारण्यापूर्वी प्रवाशाचे गंतव्यस्थान दिसणार नाही, असे ॲप डिझाइन असावे. प्रवाशाला लाइव्ह लोकेशन शेअरिंग व प्रवास स्थिती पाहण्याची सुविधा ॲपवर असावी. दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा अनिवार्य असतील.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Ola Uber आणि Rapido च्या मनमानीला आता ब्रेक, ड्रायव्हरचं काम शिफ्टनुसार, भाडेही नियमाप्रमाणेच! सरकारी मसुदा आला
Next Article
advertisement
Tejasvi Ghosalkar On Uddhav Thackeray: 'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरमधलं राजकारण तापलं
'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरम
  • मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे

  • भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला

  • दहिसरमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर असता तर त्याने पक्ष सोडला नस

View All
advertisement