छावा पाहा अन् बिलात सवलत मिळवा! पंढरपुरातील महाराजांच्या मावळ्याची भन्नाट ऑफर

Last Updated:

महाराष्ट्रासह देशभरात कुठेही छावा चित्रपट पाहिला आणि पंढरपुरात हॉटेल ग्रँड येथे येऊन थिएटरचे तिकीट दाखवले तरी हॉटेलच्या बिलावर 25 टक्के सूट देण्यात येणार आहे.

News18
News18
पंढरपूर: छावा चित्रपटाची क्रेझ सध्या महाराष्ट्रासह देशभरात दिसून येत आहे. याच चित्रपटाच्या अनुषंगाने आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने पंढरपुरात एक अनोखी ऑफर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. छावा चित्रपट पाहून थिएटरचे तिकीट दाखविल्यास हॉटेल ग्रँड येथील जेवणाच्या बिलावर तब्बल 25 टक्के इतकी भरघोस सूट देण्यात आली आहे.
मुंबई - पुणे अशा ठिकाणी असणाऱ्या ऑफरचे लोण आता पंढरपुरात येऊन ठेपले आहे. मात्र ह्याच ऑफर देत असताना शिवजयंतीच्या असणाऱ्या उत्साही वातावरणाचा फायदा शिवभक्तांना मिळवून देण्याची अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे.

हॉटेलच्या बिलावर 25 टक्के सूट

महाराष्ट्रासह देशभरात कुठेही छावा चित्रपट पाहिला आणि पंढरपुरात हॉटेल ग्रँड येथे येऊन थिएटरचे तिकीट दाखवले तरी हॉटेलच्या बिलावर 25 टक्के सूट देण्यात येणार आहे. हॉटेल ग्रँड आणि श्रीयस रेस्टॉरंटच्या माध्यमातून दिलीप धोत्रे यांनी ही ऑफर लागू केली आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी हॉटेल ग्रँड आणि श्रीयस रेस्टॉरंट यांच्या वतीने दिलीप धोत्रे यांनी ही ऑफर ठेवली आहे.
advertisement

'छावा' बॉक्स ऑफिसवर गरजतोय 

विकी कौशलचा ऐतिहासिक चित्रपट 'छावा' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाची क्रेझ कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने दोन दिवसांत जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला होता, तर पहिल्याच आठवड्यात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही तो सामील झाला आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर फायटर सारख्या चित्रपटांना छावाने मागे टाकले आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. ज्याचे फायदे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर दिसून आले आहेत. हा चित्रपट 2025 मध्ये धमाकेदार ओपनिंग करणारा आणि विक्की कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छावा पाहा अन् बिलात सवलत मिळवा! पंढरपुरातील महाराजांच्या मावळ्याची भन्नाट ऑफर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement