Beed : संतोष देशमुख प्रकरणात नवं कनेक्शन! आरोग्यमंत्र्यांनी निलंबन केलेले बीडचे डॉ. अशोक थोरात कोण?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Beed Who is Dr Ashok Thorat : भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर गंभीर आरोप केला होता, त्यानंतर आता डॉक्टर अशोक थोरात यांचे निलंबन करण्यात आलंय.
Santosh Deshmukh Murder Case Update : बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचे निलंबन करण्यात आलं आहे. कोविड काळात घोटाळा केल्याचा भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली. या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबीटकर यांनी विधिमंडळात घोषणा केली होती. विभागीय चौकशी तीन महिन्यात पूर्ण केली जाईल, असं आश्वासन देखील देण्यात आलंय. कोविड काळात बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केला त्यात दोषी आढळले. कारवाई करण्याऐवजी नाशिकला बदली केली. नमिता मुंदडा यांनी गंभीर आरोप केला होता, त्यानंतर आता डॉक्टर अशोक थोरात यांचे निलंबन करण्यात आलंय.
संतोष देशमुख प्रकरणात कनेक्शन
आता परत पुन्हा बीड जिल्ह्यात बदली का? दोषी असतील तर डॉ अशोक थोरात वरती गुन्हा दाखल करणार का? असा सवाल विचारला जातोय. प्राथमिक चौकशीमध्ये डॉक्टर अशोक थोरात औषध खरेदीमध्ये सकृत दर्शनी अनियमित्ता दिसून आली होती. अशोक थोरात यांना सस्पेंड आणि विभागीय चौकशीची घोषणा तीन महिन्यात पूर्ण करावी, असं आरोग्यमंत्र्यांची लक्षवेधीला उत्तर देताना घोषणा केली आहे.
advertisement
विधिमंडळात निलंबनाची कारवाई
आरोग्यमंत्र्यांनी विधिमंडळात निलंबनाची कारवाईची घोषणा केलेले डॉक्टर अशोक थोरात कोण? असा सवाल विचारला जातोय. डॉक्टर अशोक थोरात यांचं संतोष देशमुख प्रकरणात कनेक्शन देखील समोर आलंय.
डॉक्टर अशोक थोरात कोण?
डॉ. अशोक थोरात पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे ओएसडी होते. कोरोना काळात बीडमध्ये डॉ. अशोक थोरात हे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून तीन वर्ष कारभार पाहिला होता. त्यानंतर बीडहून त्यांची नाशिकला बदली झाल पुन्हा ते जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून बीडमध्ये रुजू आहेत. यापूर्वी दोन वेळा थोरात बीडमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल डॉ. अशोक थोरात आणि तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमने दिला होता. तर अंजली दमानिया यांनी आरोप केल्यानंतर अंबाजोगाई येथील डॉक्टर थोरात यांचे पियूष हॉटेल चर्चेत आले होते.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Mar 25, 2025 1:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed : संतोष देशमुख प्रकरणात नवं कनेक्शन! आरोग्यमंत्र्यांनी निलंबन केलेले बीडचे डॉ. अशोक थोरात कोण?







