सरनाईकांच्या दहीहंडीत विश्वविक्रम, दृश्य पाहून मंत्र्याच पोरगं रडलं,10 थर लावणारं कोकण नगर पथक नेमकं कुठलं?

Last Updated:

जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने यंदा 10 मानवी मनोरे रचून जय जवान गोविंदा पथकाचा विक्रम मोडित काढला आहे.

News18
News18
ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदा पथकांमध्ये थरांची चुरस पाहायला मिळाली. यंदा दहा थर कोणतं गोविंदा पथक लावणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. यामध्ये बाजी मारली ती कोकण नगर गोविंदा पथकानं. कोकण नगर गोविंदा पथकानं दहीहंडी उत्सवात दहा थरांची सलामी दिली.
ठाण्याला दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखले जाते. जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने यंदा 10 मानवी मनोरे रचून जय जवान गोविंदा पथकाचा विक्रम मोडित काढला आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीत हा अनोखा विक्रम घडला आहे.  मंत्री सरनाईक यांनी या विक्रमावर आनंद व्यक्त करतकोकण नगर गोविंदा पथकाला  25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करत त्यांचे अभिवादन केले. त्यानंतर सोशल मीडियावर  विक्रमाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.
advertisement

कोकण नगर पथक आहे तरी कुठलं? 

जोगेश्वरीच्या  कोकण नगर गोविंदा पथकाचे प्रशिक्षक विवेरक कोचरेकर आहेत. मागील १२ वर्षपासून ते गोविंदा पथकाला प्रशिक्षण देत आहे. कोकण नगर गोविंदा पथक हे सर्वात जुने पथक आहे. अतिशय शिस्तबद्धपणे मानवी मनोरे रचण्यासाठी ओळखले जाते सर्वात प्रथम नऊ थर लावण्याचा विक्रम देखील 2022 साली कोकण नगर पथकाने केले होता. अखेर आज त्यांनी आज विश्वविक्रम करत 10 थर लावले.
advertisement

पाहा व्हिडीओ: 

गोविंदा आला रे…आला…जरा मटकी सांभाल…,गो..गो..गोविंदा, अटके झटके मारे है तु.. तु आज शोला तो हम भी फुंवारे है..,चांदी की डाल पे सोने का मोर…,मच गया शोर सारी नगरी में…अशा गाण्यांचा ठेका धरत आणि काळजाचा ठोका चुकवेल असा थरार ‘याची देही याची डोळा’ असा दहीहंडीचा उत्सव महाराष्ट्रवासीयांनी अनुभवला…गोविंदाच्या ‘अजोड’ जिद्दीचा अद्भूत नजारा पाहून सर्वच जण थक्क झाले. कुठे आठ थर लागले तर कुठे नऊ थर असा अद्भूत उत्सव मुंबईसह राज्यभरात मोठ्या जल्लोषात साजरा झाला आहे. बॉलिवूडच्या स्टार मंडळींनीही गोविंदाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष हजेरी लावली.
advertisement
 
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सरनाईकांच्या दहीहंडीत विश्वविक्रम, दृश्य पाहून मंत्र्याच पोरगं रडलं,10 थर लावणारं कोकण नगर पथक नेमकं कुठलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement