गारगार हवा देणाऱ्या AC ने घाम फोडला! कंपन्यांनी वाढवले दर, किती रुपयांना मिळणार, काय आहे कारण?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
व्होल्टास, डायकिन, एलजी आणि ब्लू स्टार यांनी एसीच्या किमती ५ ते १५ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. कॉपर आणि सुट्या भागांच्या दरवाढीमुळे ही वाढ झाली आहे. नवीन एसी अधिक एनर्जी इफिशिएंट असतील.
उन्हाळा सुरू होताच एसीच्या थंड हवेची आस लागलेल्या ग्राहकांना आता वाढत्या किमतींमुळे चांगलाच घाम फुटणार आहे. तांबे आणि सुट्या भागांच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे व्होल्टास, डायकिन आणि एलजी सारख्या बड्या कंपन्यांनी एसीच्या किमती ५ ते १५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कच्चा माल आणि डॉलरच्या मजबुतीमुळे आता नवीन एसी खरेदी करताना सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.
मार्च महिन्यात उकाडा प्रचंड वाढला आहे. चैन पडत नाही इतकी गरमी होत आहे. घामाच्या धारा वाहात आहेत. एककीडे तापमानाचा पारा वाढत असताना दुसरीकडे एसी मार्केटमध्येही किमतीचा भडका उडाला. व्होल्टास, डायकिन, एलजी आणि ब्लू स्टार यांसारख्या दिग्गज कंपन्यांनी आपल्या एसीच्या किमतीत ५ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात थंड हवा खाण्यासाठी आता ग्राहकांना जास्तच पैसे मोजावे लागणार आहेत.
advertisement
किमती का वाढल्या?
एसी महागण्यामागे कॉपरच्या वाढलेल्या किमती हे सर्वात मोठे कारण आहे. एसीच्या कंडेंसर, मोटर आणि वायरिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कॉपर वापरले जाते. २०२६ मध्ये जागतिक बाजारपेठेत कॉपरचे दर ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहेत. सध्या कॉपर $५.८ प्रति पाउंड किंवा सुमारे १३,००० डॉलर प्रति टनापर्यंत महागले आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि एआय डेटा सेंटर्ससाठी कॉपरची मागणी वाढल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
advertisement
डॉलरचा भाव आणि नवीन नियम
भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ९१-९२ च्या स्तरावर पोहोचला आहे. कंपन्यांना एसीचे सुटे भाग आयात करावे लागतात, डॉलर महागल्याने हा खर्च वाढला आहे. जानेवारी २०२६ पासून ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएंसीचे नवीन स्टार रेटिंग नियम लागू झाले आहेत.
नवीन एसी आता अधिक वीज वाचवणारे असतील, पण त्यांच्या डिझाइन आणि निर्मितीचा खर्च वाढल्याने किमतीत भर पडली आहे. जागतिक अस्थिरतेमुळे मालवाहतूक महागली असून त्याचा भार शेवटी ग्राहकांच्या खिशावर पडत आहे.
advertisement
कोणत्या कंपनीने किती वाढ केली?
Daikin: एप्रिलपासून किमतीत १२ टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे.
Blue Star: फेब्रुवारीमध्येच दरात ८-१० टक्क्यांची वाढ केली आहे.
Voltas: उत्पादनाचा खर्च १५ टक्क्यांनी वाढल्याने किमतीत मोठी वाढ केली आहे.
काय आहे सकारात्मक बाजू?
जरी एसी खरेदी करणे आता महाग झाले असले, तरी नवीन मॉडेल अधिक एनर्जी इफिशिएंट आहेत. यामुळे जरी आज तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागत असले, तरी भविष्यात तुमच्या वीज बिलात मोठी बचत होणार आहे. तुम्ही एसी घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला वाढलेल्या किंमतीनुसार पैसे भरावे लागणार आहेत. त्यामुळे आधी एसीच्या किंमती पाहून मगच खरेदीचा प्लॅन करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 11:03 AM IST
मराठी बातम्या/मनी/
गारगार हवा देणाऱ्या AC ने घाम फोडला! कंपन्यांनी वाढवले दर, किती रुपयांना मिळणार, काय आहे कारण?








