ड्रॅगन फ्रुट सोडा आता पुण्यात पिकतंय पॅशन फ्रुट, पाहा कशी होतेय ब्राझीलच्या फळाची शेती?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
ब्राझिलियन असलेल्या फळाची आता पुण्यात लागवड करण्यात आली आहे. या फळाचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत.
पुणे, 7 डिसेंबर : सध्याच्या काळात काही शेतकरी आपल्या शेतीत नवनवे प्रयोग करत आहेत. तसेच देश विदेशातील पिकेही घेण्याचा प्रयत्न करतायेत. महाराष्ट्रात सफरचंद, ड्रॅगन फ्रुट सारख्या फळांची शेती यशस्वी होत असताना आणखी एक विदेशी फळ पिकवलं जातंय. पुण्यातील इंदापूरचे शेतकरी पांडुरंग बराळ यांनी चक्क ब्राझिलियन पॅशन फ्रुटची लागवड केलीय. विशेष म्हणजे या शेतीतून त्यांना चांगला नफाही मिळत आहे.
युट्युबवर मिळाली माहिती
पांडुरंग बराळ हे इंदापूर तालुक्यातील कचरवाडीचे प्रयोगशील शेतकरी आहेत. आपल्या शेतीत ते नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. युट्युबवर त्यांना मुळचे ब्राझिलियन असलेल्या पॅशन फ्रुटची माहिती मिळाली. राजस्थानातील शेतकऱ्याने हे फळपीक घेतल्याचं त्यांना समजलं. तेव्हा त्यांनी राजस्थानात जावून तेथील शेतकऱ्याची भेट घेतली. पॅशन फ्रुटबाबत माहिती घेऊन आपल्या शेतात या फळाची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
रोपे तयार केली
बराळ यांनी राजस्थानातून पॅशन फ्रुटच्या बिया आणि फळे आणली. त्यापासून रोपे तयार केले. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर साडेतीन गुंठे जागेत पॅशन फ्रुटची लागवड केली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर क्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एक एकर शेतात पॅशन फ्रुटची लागवल केली, असे त्यांनी सांगितले.
advertisement
कशा पद्धतीने करतात लागवड?
ओळी मधील अंतर हे 10 फूट आणि रोपातील अंतर हे सात फूट ठेवलं. या पिकासाठी शेण खत वापरलं जातं. रासायनिक खतांचा वापर शक्यतो केला जात नाही. लागवडीनंतर साधारण दोन ते अडीच महिन्यात स्टेचिंग वर हे झाड पसरलं जातं. त्याची बांधणी झाल्यावर जुलै ऑगस्ट मध्ये फुल येण्यास सुरुवात होते. या फळा वर कुठला ही रोगाचा, बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही. या फळाची किंमत साधारण 70 रुपये ते 140 रुपये प्रति किलो पर्यंत आहे, असेही बराळ सांगतात.
advertisement
पॅशन फ्रुटचे फायदे
या फळा मध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि सी मोठ्या प्रमाणत आढळतं. आयर्न, फॉसफर्स देखील आढळतं. रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. पांढऱ्या पेशीसाठीही हे फळ उपयुक्त आहे. असे अनेक फायदे या फळाचे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा विचार करून शेती करावी. या नवीन तंत्रज्ञानात फायदा आहे. यामधून चांगले उत्पन्न मिळून नफा ही चांगला मिळवता येतो, असं शेतकरी अमर बराळ सांगतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 07, 2023 11:51 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
ड्रॅगन फ्रुट सोडा आता पुण्यात पिकतंय पॅशन फ्रुट, पाहा कशी होतेय ब्राझीलच्या फळाची शेती?