या शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार नाहीत पैसे, सरकारने तातडीनं दिला अलर्ट! आताच करुन द्या हे काम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अकोला जिल्ह्यातील १,५८८ शेतकऱ्यांचे आधार आणि KYC अपडेट न झाल्याने पीककर्ज, कर्जमाफी, अनुदान मिळण्यास अडथळा; सहकार विभागाने कडक इशारा दिला.
शासकीय योजनांचा लाभ थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी आधार कार्ड आणि केवायसी (KYC) अपडेट असणे अनिवार्य आहे. मात्र, अकोला जिल्ह्यातील तब्बल १,५८८ शेतकऱ्यांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. जर ही तांत्रिक पूर्तता वेळेत झाली नाही, तर या शेतकऱ्यांना पीककर्ज, कर्जमाफी आणि विविध अनुदानांपासून हात धुवावा लागण्याची शक्यता आहे. सहकार विभागाने यासंदर्भात कडक इशारा दिला असून प्रलंबित खात्यांची यादी जाहीर केली आहे.
तुमच्या तालुक्याची स्थिती काय?
अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध सोसायट्यांमध्ये ही खाती प्रलंबित आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पाहता मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक अनास्था दिसत आहे.
मूर्तिजापूर: ४३७ खाती
बार्शीटाकळी: ३२० खाती
तेल्हारा: २५३ खाती
अकोला: २१६ खाती
पातूर: १३३ खाती
अकोट: ७८ खाती
बाळापूर: ५८ खाती
का रखडू शकतो तुमचा लाभ?
राज्य सरकारने आता पीककर्ज आणि कृषी योजनांसाठी Aadhaar Link करणं बंधनकारक केलं आहे. जोपर्यंत तुमच्या बँक खात्याला आधार लिंक होत नाही आणि केवायसी पूर्ण होत नाही, तोपर्यंत ऑनलाइन प्रणालीतून निधी वितरित करताना तांत्रिक अडथळे येतात. थोडक्यात, सरकारकडून पैसे सुटले तरी तुमच्या खात्यापर्यंत ते पोहोचणार नाहीत.
advertisement
आता पुढे काय करावे?
ज्या शेतकऱ्यांचे आधार किंवा केवायसी अजूनही अपूर्ण आहे, त्यांनी वेळ न घालवता आपल्या संबंधित सेवा सहकारी सोसायटी किंवा बँक शाखेशी संपर्क साधणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपले खाते 'अपडेट' करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी सोसायट्यांना विशेष मोहीम राबवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
Location :
Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 2:12 PM IST
मराठी बातम्या/मनी/
या शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार नाहीत पैसे, सरकारने तातडीनं दिला अलर्ट! आताच करुन द्या हे काम










