बॉसने टेबलावर ठेवले 70 कोटी; कर्मचाऱ्यांना म्हणाला, जेवढे मोजाल तेवढे घरी घेऊन जा; बोनस रेसची जगभरात चर्चा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Cash Bonuse: चीनमधील एका उत्पादन कंपनीने बोनस वाटपाची अनोखी पद्धत अवलंबत हजारो कर्मचाऱ्यांसमोर रोख रकमेचे ढीग लावले. “जितके मोजाल तितके घ्या” या संकल्पनेमुळे हा समारंभ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
बीजिंग: चीनमधील एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची एक अजब आणि थक्क करणारी पद्धत अवलंबली ज्याची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. या कंपनीत कर्मचाऱ्यांना बोनसचा धनादेश (Check) दिला जात नाही, तर टेबलवर नोटांचे बंडल ठेवून सांगितले जाते की, ठराविक वेळेत तुम्ही जितक्या नोटा मोजू शकाल, तितकी रक्कम तुमची!
चीनच्या हेनान प्रांतातील 'हेनान कुआंगशान क्रेन कंपनी लिमिटेड' (Henan Kuangshan Crane Company Limited) ने 13 फेब्रुवारी रोजी आपला वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी सुमारे 7 हजार कर्मचाऱ्यांसाठी 800 जेवणाची टेबलं सजवण्यात आली होती. कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणाचे केंद्र होते ते म्हणजे 60 दशलक्ष युआन (सुमारे 70 कोटी रुपये) पेक्षा जास्त रोख रक्कम. कर्मचाऱ्यांना एक ठराविक वेळ देण्यात आला होता, त्या वेळात त्यांनी नोटांचे बंडल मोजायचे होते. वेळ संपल्यावर ज्यांनी जेवढी रक्कम मोजली, तेवढा त्यांचा बोनस ठरला.
advertisement
नफ्याचा 70 टक्के हिस्सा कर्मचाऱ्यांच्या झोळीत
रिपोर्टनुसार कंपनीने 2025 मध्ये 270 दशलक्ष युआनचा नफा कमावला आहे. यातील 180 दशलक्ष युआन म्हणजेच नफ्याचा सुमारे 70 टक्के हिस्सा कर्मचाऱ्यांमध्ये बोनस म्हणून वाटण्याचा निर्णय घेण्यात आला. कंपनीचे मालक कुई पीजुन (Cui Peijun) यांनी सांगितले की आजचा तरुण कर्मचारी कार लोन आणि घराच्या हप्त्यांच्या ओझ्याखाली दबलेला असतो. अशा परिस्थितीत थेट रोख रक्कम मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळतो. यापूर्वी कंपनी सोन्याचे हार आणि अंगठ्या भेट म्हणून देत असे मात्र आता थेट रोख रक्कम देण्यावर भर दिला जात आहे.
advertisement
प्रत्येकाला किमान 20 हजार युआनचा बोनस
या अनोख्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान 20,000 युआन (सुमारे 2.30 लाख रुपये) देण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेचे ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात आले असून सोशल मीडियावर याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. या कंपनीने 2024 मध्येही 170 दशलक्ष युआनचा बोनस वाटला होता. तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिनी 2 हजार महिला कर्मचाऱ्यांना 1.6 दशलक्ष युआनचा बोनस देऊन सन्मानित करण्यात आले होते.
advertisement
💸 CHINA COMPANY TURNS BONUSES INTO MONEY-GRABBING GAME
Employees at a Henan firm raced to grab and count cash from a 50-meter table. One lucky worker walked away with nearly $14,500. Total bonus pool: $14M. #China #LunarNewYear pic.twitter.com/Acs4ZbOHuX
— Evoclique (@Evoclique_) February 13, 2026
advertisement
130 देशांमध्ये विस्तारलेला व्यापार
2002 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी क्रेन आणि संबंधित उपकरणांची निर्मिती करते. जगातील 130 पेक्षा जास्त देशांमध्ये या कंपनीचा व्यापार असून कंपनीच्या 98.88 टक्के शेअर्सची मालकी स्वतः मालकाकडेच आहे. नोटांच्या बंडलच्या स्वरूपात बोनस वाटण्याच्या या परंपरेमुळे ही कंपनी कर्मचाऱ्यांप्रती विश्वास आणि आदर व्यक्त करणारी कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे.
advertisement
(न्यूज 18 मराठीने या व्हिडिओची सत्यता पडताळी नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 4:43 PM IST
मराठी बातम्या/मनी/
बॉसने टेबलावर ठेवले 70 कोटी; कर्मचाऱ्यांना म्हणाला, जेवढे मोजाल तेवढे घरी घेऊन जा; बोनस रेसची जगभरात चर्चा






