Success Story : ऑफिस बॉय म्हणून केलं काम, ऊसतोड कामगाराचा मुलगा आज 2 कंपनीचा CEO
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
मेहनत, जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं. कधीकाळी पुण्यातील इन्फोसिस कंपनीमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या ऊसतोड कामगाराचा मुलगा आज दोन कंपनीचा सीईओ आहे.
पुणे: मेहनत, जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं. कधीकाळी पुण्यातील इन्फोसिस कंपनीमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या ऊसतोड कामगाराचा मुलगा आज दोन कंपनीचा सीईओ आहे. त्याचं नाव दादासाहेब भगत. त्यांचा प्रवास एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा आहे. आज त्यांच्या कंपन्यांचा टर्नओव्हर तब्बल 6 कोटींपेक्षा जास्त आहे. त्याच्या या प्रवासाबद्दल त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
एका घटनेनं बदललं आयुष्य
दादासाहेब भगत यांचा जन्म बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या कुटुंबात झाला. वर्षातील सहा महिने शाळा आणि सहा महिने ऊसतोडणी असे त्यांचे बालपण गेले. कठीण परिस्थितीतही त्यांनी ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर कामाच्या शोधात ते पुण्यात आले. सुरुवातीला त्यांना 4 हजार रुपये पगाराची नोकरी मिळाली. पुढे त्यांनी इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम केले, जिथे 9 हजार पगार होता. साफसफाई आणि गेस्ट हाऊसशी संबंधित कामे ते करत होते. याच काळात मेहनत आणि कौशल्यातील फरक त्यांना समजला. ही घटना त्यांच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट देणारी ठरली.
advertisement
कोडिंग आणि ग्राफिक्स शिकले...
इन्फोसिसमध्ये काम करत असतानाच दादासाहेब भगत यांनी शिकणं सुरू ठेवलं. दिवसा नोकरी आणि वेळ मिळेल तेव्हा शिक्षण असा त्यांचा दिनक्रम होता. त्यांनी ग्राफिक्स डिझायनिंग आणि ॲनिमेशन शिकले. यामुळे त्यांना मुंबईत नोकरी मिळाली. पुढे मुंबईत काम करत असताना त्यांनी C++ आणि Python शिकले.
advertisement
ऑफिस बॉय ते कंपनीचे सीईओ
view commentsदादासाहेब भगत यांना डिझाइन आणि ग्राफिक्समध्ये पुन्हा वापरता येणाऱ्या टेम्पलेट्सवर काम करण्याची कल्पना सुचली. त्यांनी ही टेम्पलेट्स ऑनलाइन विकायला सुरुवात केली. त्याच काळात त्यांचा बाईक अपघात झाला आणि काही महिने विश्रांती घ्यावी लागली. त्यानंतर त्यांनी Design Template ही कंपनी सुरू केली. कोरोना काळात ते गावी गेले, गावातील तरुणांना प्रशिक्षण देत गाईच्या गोठ्यात ऑफिस सुरू केले. या कामाची दखल मन की बात कार्यक्रमात घेतली गेली. यानंतर त्यांनी Bhaktavatsal Production’ही कंपनी सुरू केली. एका ऑफिस बॉयपासून सुरू झालेला प्रवास आज 6 कोटींपेक्षा जास्त उलाढालीपर्यंत पोहोचला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 17, 2025 5:14 PM IST







