Success Story : शेतकऱ्यानं लावलं डोकं, केली चेकनेट बोरांची शेती, 7 लाखांचा मिळाला नफा

Last Updated:

सध्या बोरांचा हंगाम सुरू असून यामध्ये विविध प्रकारची बोर बाजारात विक्रीसाठी आल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. गोपीनाथ चव्हाण यांनी बोर विक्रीतून 5 ते 7 लाखांचा नफा मिळवला आहे.

+
पाच

पाच वर्षांपूर्वी केली चेकनेट बोरची लागवड, खर्च वजा करून उत्पन्न मिळाला लाखात 

सोलापूर : सध्या बोरांचा हंगाम सुरू असून यामध्ये विविध प्रकारची बोर बाजारात विक्रीसाठी आल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. पण सर्वात जास्त मागणी बाजारामध्ये चेकनेट बोरांना असून याच बोरांच्या विक्रीतून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाफळे गावात राहणाऱ्या गोपीनाथ चव्हाण यांनी 5 ते 7 लाखांचा नफा मिळवला आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी गोपीनाथ चव्हाण यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
वाफळे गावात राहणारे गोपीनाथ नवनाथ चव्हाण हे गेल्या 15 वर्षांपासून बोरांची शेती करत असून गोपीनाथ यांनी उमरान आणि चमेलीच्या बोरांची बाग केली होती. या बोरांना बाजारात भाव मिळत नसल्याने त्यांनी 5 वर्षांपूर्वी उमरान आणि चमेली या झाडांची छाटणी करून त्यांनी चेकनेट या जातीच्या बोरांच्या झाडाची कलम भरून घेऊन लागवड केली. चेकनेट बोरांच्या झाडांवर भुरी हा रोग होऊ नये म्हणून प्रत्येक दहा ते बारा दिवसाला फवारणी करून घेण्यात येते.
advertisement
चेकनेट बोरांची तोडणी करून पुणे, हैदराबाद येथील बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात येते. सध्या चेकनेट बोरांना बाजारात 80 ते 90 रुपये किलो दराने दर मिळत आहे. डिसेंबरच्या महिन्यात या चेकनेट बोरांना दर कमी असतो, तर जानेवारीमध्ये संक्रांतीच्या अगोदर याच बोरांना 100 ते 120 रुपये किलो दराने भाव मिळतो. चेकनेट बोर खाण्यास गोड असल्याने याची मागणी जास्त आहे. चेकनेट बोराच्या लागवडीसाठी गोपीनाथ चव्हाण यांना 5 लाख रुपयांपर्यंत खर्च आला होता.
advertisement
तर या बागेची लागवड करून पाच वर्षे पूर्ण झाले असून लागवडीचा खर्च वजा करून गोपीनाथ चव्हाण यांना आतापर्यंत या बोरांच्या विक्रीतून 5 ते 7 लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. उमरान आणि चमेली या बोरांची लागवड न करता शेतकऱ्यांनी एकदा चेकनेट बोरांची लागवड केल्यास अधिक नफा मिळेल, असा सल्ला शेतकरी गोपीनाथ चव्हाण यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : शेतकऱ्यानं लावलं डोकं, केली चेकनेट बोरांची शेती, 7 लाखांचा मिळाला नफा
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement