भारतातील 'या' राज्याच्या मातीत लपलीय श्रीमंती, जमीनीत मिळतात हिरे, 1 ग्रॅम हिर्याची किंमत ऐकून धक्का बसेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आजही भारतात अशा अनेक ठिकाणी हिरे सापडतात ज्यांची किंमत ऐकूनच कोणीही थक्क होईल. कारण फक्त 1 ग्रॅम हिर्याची किंमत तुम्हाला आश्चर्यचकीत करु शकते.
मुंबई : भारतीय भूमीला निसर्गाने जणू काही अमाप संपत्तीच दिली आहे. इथल्या मातीखालून केवळ पिके, धान्य किंवा भाजीपाला नाही तर सोनं, चांदी आणि मौल्यवान हिरेसारखी रत्नेही सापडतात. जगभरात प्रसिद्ध असलेले अनेक हिरे प्रत्यक्षात भारतातूनच मिळाले आहेत. यामध्ये सर्वात प्रसिद्ध नाव म्हणजे कोहिनूर हिरा. आजही भारतात अशा अनेक ठिकाणी हिरे सापडतात ज्यांची किंमत ऐकूनच कोणीही थक्क होईल. कारण फक्त 1 ग्रॅम हिर्याची किंमत 10 लाखांपासून 50 लाखांपर्यंत असू शकते.
चला तर मग जाणून घेऊया भारतातील हिर्यांच्या खाणी कुठे आहेत, त्यांचा इतिहास काय आहे आणि आज त्यांची स्थिती कशी आहे.
भारतात सर्वाधिक हिरे कुठे मिळतात?
भारतातील सर्वात जास्त हिरे मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात सापडतात. या ठिकाणाला “हिर्यांचे शहर” म्हणून ओळखलं जातं.
इथली मझगवां खाण ही देशातील एकमेव औद्योगिक डायमंड माईन आहे, जी नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NMDC) चालवते.
advertisement
या खाणीतून दरवर्षी सुमारे 84,000 कॅरेट हिरे मिळतात आणि देशात मिळणाऱ्या जवळपास 90 टक्के हिरे याच भागातून येतात.
2015 च्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण 31.8 मिलियन कॅरेट डायमंड रिजर्वपैकी 28.7 मिलियन कॅरेट फक्त मध्य प्रदेशात आहेत.
आंध्र प्रदेशचा डायमंड इतिहास
कधीकाळी आंध्र प्रदेश हे जगातील सर्वात मोठं हिरा उत्पादन केंद्र होतं.
कृष्णा आणि गुंटूर जिल्ह्यातील कोल्लूर खाणींमधून जगप्रसिद्ध कोहिनूर, होप डायमंड आणि ओरलोव डायमंड सापडले होते.
advertisement
16 व्या ते 18 व्या शतकात गोलकुंडा हे जगभरातील हिरा व्यापाराचं प्रमुख केंद्र होतं. सध्या मोठ्या प्रमाणावर खाणकाम थांबलं असलं तरी या भागात अजूनही 1.8 मिलियन कॅरेट रिजर्व आहेत, ज्यामुळे आंध्र प्रदेश देशातील दुसरं सर्वात मोठं डायमंड राज्य मानलं जातं.
छत्तीसगडमधला हिर्यांचा खजिना
छत्तीसगड राज्यही हळूहळू हिर्यांच्या उत्पादनात आपली ओळख निर्माण करत आहे. इथं सुमारे 1.3 मिलियन कॅरेट डायमंड रिजर्व आहेत. रायपूर आणि बस्तर परिसरात सापडलेल्या “किंबरलाइट पाइप्स”मुळे या भागात हिरे सापडण्याची मोठी शक्यता आहे. सध्या इथे खाणकाम कमी प्रमाणात होतं, परंतु भविष्यात हे राज्यही मध्य प्रदेशला स्पर्धा देऊ शकतं. 2015 च्या IBM डेटानुसार, देशातील 4.1% डायमंड रिजर्व छत्तीसगडमध्ये आहेत.
advertisement
हिर्यांची किंमत कशी ठरते?
हिर्यांची किंमत त्यांच्या गुणवत्ता, आकार, रंग आणि पारदर्शकतेवर ठरते.
साधारणपणे 1 ग्रॅम (5 कॅरेट) हिर्याची किंमत ₹10 लाख ते ₹ 50 लाखांपर्यंत असू शकते.
मध्य प्रदेशातील पन्न्यात सापडणारे बहुतांश हिरे जेम-ग्रेड (3%) आणि इंडस्ट्रियल-ग्रेड (3%) असतात.
2013 मध्ये गोलकुंडातील प्रिंसी डायमंड (34.65 कॅरेट) तब्बल ₹ 280 कोटींना लिलावात विकला गेला होता.
advertisement
भारतातील डायमंड इतिहास किती जुना आहे?
भारत हा जगातील सर्वात जुना डायमंड उत्पादक देश आहे. सुमारे 3,000 वर्षांपूर्वीपासून भारतच जगाला हिरे पुरवत होता. 1726 मध्ये ब्राझीलमध्ये हिरे सापडेपर्यंत भारतच जगातील एकमेव डायमंड पुरवठादार होता. गोलकुंडा आणि पन्ना येथील हिरे भारताला जागतिक ओळख मिळवून देणारे ठरले.
मार्को पोलोसारख्या प्रवाशांनी भारतातील हिर्यांच्या कथा युरोपपर्यंत पोहोचवल्या. कोहिनूरसारखा हिरा बाबरपासून ब्रिटिश राजवटीपर्यंतच्या इतिहासाचा साक्षीदार राहिला आहे. आज भारत जगात डायमंड कटिंग आणि पॉलिशिंग क्षेत्रात आघाडीवर आहे आणि त्यामध्ये सुरत शहर महत्त्वाची भूमिका बजावते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2025 6:36 PM IST
मराठी बातम्या/मनी/
भारतातील 'या' राज्याच्या मातीत लपलीय श्रीमंती, जमीनीत मिळतात हिरे, 1 ग्रॅम हिर्याची किंमत ऐकून धक्का बसेल


