उरले फक्त 8 दिवस, लाडकी बहीण योजनेसाठी E KYC ला मुदतवाढ मिळणार? आदिती तटकरे यांनी दिलं उत्तर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
लाडकी बहीण योजनेसाठी 18 नोव्हेंबर अंतिम तारीख आहे. E-KYC न केल्यास लाभ मिळणार नाही. आदिती तटकरे यांनी मुदतवाढीचा विचार नसल्याचे स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यासोबत ‘लाडकी बहीण योजना’ बंद होणार का? योजनेचा पुढील हप्ता कधी येणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. यासोबतच, ज्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी E-KYC पूर्ण केलेले नाही, त्यांच्यासाठी आता फक्त 8 दिवसांचा अवधी बाकी आहे. राज्य शासनाच्या 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ अखंडित मिळण्यासाठी सर्व लाभार्थींनी E-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे.
कोणती कागदपत्र जमा करावी लागणार?
लाभार्थींना लाभार्थीचा आधार क्रमांक, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. अंतिम तारीख जवळ येत असताना अनेक महिलांनी इंटरनेट सेवा केंद्रांवर धाव घेण्यास सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे, काही महिलांकडे आधारशी जोडलेला मोबाईल नसल्याने त्या आधार सेवा केंद्रात नाव नोंदणी करण्यासाठी दोन दोनदा फेर्या मारताना दिसत आहेत. मुदत वाढवण्याबाबत चर्चा सुरू असतानाच शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या तरी मुदतवाढ देण्याचा विचार नाही असं स्पष्ट दिसत आहे.
advertisement
आदिती तटकरे यांनी दिली अपडेट
लाडकी बहीणचा लाभ घेणाऱ्या महिलांनी तातडीनं E KYC प्रक्रिया पूर्ण करावी, यासाठी सध्या तरी कोणत्याही मुदतवाढीचा विचार करण्यात आलेला नाही. जे E KYC कऱणार नाहीत त्यांची नावं यादीतून वगळण्यात येईल त्यांना योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही. योजनेतील पारदर्शकता आणि निधीचा गैरवापर रोखण्यासाठी तांत्रिक पडताळणी आवश्यक आहे.
advertisement
लाभार्थींना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, ही शासनाची भूमिका आहे. सध्या तरी मुदतवाढ देण्याचा विचार नाही. E-KYC प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. 18 नोव्हेंबर हीच अंतिम तारीख आहे. लाभार्थींनी शेवटची तारीख येण्याची वाट न पाहता लगेच प्रक्रिया पूर्ण करावी असं अधिकारी आणि आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.
E-KYC कसे कराल?
अधिकृत लाडकी बहीण योजना पोर्टलवर लॉगिन करा. आधार क्रमांक आणि पती/वडिलांचा आधार तपशील भरा. मोबाईल OTP द्वारे पडताळणी पूर्ण करा. बँक खाते, आधार आणि मोबाईल नंबर लिंक असल्याची खात्री करा. वडिलांचं आधार नंबर किंवा पतीचा आधार नंबर अपलोड करा.
advertisement
पुन्हा एक ओटीपी येईल तो अपलोड करा त्यानंतर तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण होईल. जर तुम्ही E-KYC वेळेत पूर्ण केले नाही, तर तुमचा हप्ता अडकू शकतो किंवा नाव यादीतून वगळले जाऊ शकते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 10, 2025 9:00 AM IST
मराठी बातम्या/मनी/
उरले फक्त 8 दिवस, लाडकी बहीण योजनेसाठी E KYC ला मुदतवाढ मिळणार? आदिती तटकरे यांनी दिलं उत्तर


