'या' देशात गेल्यावर प्रत्येक भारतीय बनतो ‘कोट्यधीश’, फक्त ₹1000 मध्ये मिळतो फाइव्ह स्टार हॉटेलचा आनंद

Last Updated:

असा एक देश आहे जिथे रुपया खूप मोठा आणि त्यामुळे तिथे जाऊन आपण खुप पैसे खर्च करु शकतो. आता तुमच्या मनात तो देश कोणता? आणि हे कसं शक्य आहे? असे असंख्य प्रश्न पडले असतील? चला त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : भारतीय रुपया हा डॉलरपेक्षा लहान आहे. त्यामुळे कोणत्याही युरोपीयन देशात आपण गेलो तर तिथे आपला रुपया कमी पडतो, ज्यामुळे आपल्याला जास्त रक्कम खर्च करावी लागते. अशावेळी अनेकांच्या मनात असं येतं की आपल्याकडे एवढे पैसे असावे की आपण परदेशात जाऊन पाण्यासारखा पैसा खर्च करावा, सगळी हौस-मोज करावी.
खरंतर आता हे करणं शक्य आहे. कारण असा एक देश आहे जिथे रुपया खूप मोठा आणि त्यामुळे तिथे जाऊन आपण खुप पैसे खर्च करु शकतो. आता तुमच्या मनात तो देश कोणता? आणि हे कसं शक्य आहे? असे असंख्य प्रश्न पडले असतील? चला त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
परदेशात फिरणं म्हणजे जास्त खर्च, असं आपण सहसा गृहित धरतो. पण दक्षिण-पूर्व आशियातलं एक छोटं आणि शांत देश लाओस हे या समजुतीला पूर्णपणे खोटं ठरवतं. निसर्गाच्या सान्निध्यात, हिरव्या डोंगरांनी वेढलेलं आणि ऐतिहासिक मंदिरांनी सजलेलं हे देश प्रवाशांना अतिशय कमी खर्चात "लक्झरी ट्रॅव्हल"चा अनुभव देतं. आश्चर्य म्हणजे, येथे पोहोचल्यावर प्रत्येक भारतीय अक्षरशः ‘कोट्यधीश’ बनतो. कारण इथली चलन व्यवस्था भारतीय रुपयाच्या तुलनेत फारच स्वस्त आहे.
advertisement
भारतीय रुपया म्हणजे लाओसमध्ये करोडोंचा व्यवहार
लाओसची चलन एकक ‘लाओ कीप’ आहे. सध्या 1 भारतीय रुपया जवळपास 251.91 लाओ कीप इतका आहे. म्हणजेच, जर तुमच्याकडे फक्त ₹50,000 असतील, तर लाओसमध्ये तुम्ही तब्बल 1 कोटी 26 लाख लाओ कीपचे मालक व्हाल. यामुळे तिथे राहणं, खाणं आणि फिरणं सगळंच अत्यंत स्वस्त आणि आरामदायी वाटतं.
advertisement
लाओसचं अधिकृत नाव आहे लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक आणि राजधानी आहे वियांग चान (Vientiane). भारत आणि लाओस यांचं नातं प्राचीन काळापासून आहे. इतिहास सांगतो की, सम्राट अशोकांनी कलिंग युद्धानंतर दक्षिण भारतातील काही लोकांनी असम आणि मणिपूरमार्गे हिंद-चीन प्रदेशात स्थलांतर केलं. त्यातूनच आजच्या लाओस प्रदेशात भारतीय मूळ लोकसंख्येचा काही अंश आला. आजही अनेक लाओसवासी आपल्याला भारतीय संस्कृतीशी जोडलेलं मानतात. लाओस हा आग्नेय आशियातील एकमेव देश आहे ज्याची समुद्रकिनारी सीमा नाही, म्हणजे तो पूर्णपणे स्थलसीमांनी वेढलेला आहे.
advertisement
कमी पैशात ‘लक्झरी’चा अनुभव
लाओसचं आकर्षण म्हणजे त्याची साधी पण मनमोहक जीवनशैली. हिरव्यागार टेकड्या, मंदिरे, नद्या आणि कॉफीच्या बागांमुळे हे देश निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे. येथे ₹1000 ते ₹2500 मध्ये चांगले हॉटेल्स मिळतात. स्ट्रीट फूड किंवा छोट्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही फक्त ₹20 ते ₹40 मध्ये स्वादिष्ट भोजन करू शकता. स्थानिक पदार्थांमध्ये स्टिकी राइस, लार्ब (मांसाची डिश) आणि नूडल सूप हे खास लोकप्रिय आहेत. फिरण्यासाठी बस आणि टुकटुकही खूप स्वस्त फक्त ₹12 ते ₹40 मध्ये सहज प्रवास करता येतो.
advertisement
एक दिवसाचा आणि सात दिवसांचा खर्च
लाओसमध्ये एका दिवसाचा सरासरी खर्च ₹1500 ते ₹3000 इतका येतो म्हणजेच भारतातील मोठ्या शहरातील एका दिवसाच्या खर्चाएवढाच. जर तुम्ही 7 दिवसांचा ट्रिप प्लॅन करत असाल, तर एकूण खर्च ₹40,000 ते ₹70,000 इतका होतो. यामध्ये हॉटेल, अन्न, ट्रान्सपोर्ट आणि पर्यटनस्थळांचा खर्च समाविष्ट असतो.
भारतीय प्रवाशांसाठी सोयीस्कर देश
लाओस भारतीय प्रवाशांसाठी खूपच सोयीचा देश मानला जातो. कारण येथे Visa on Arrival सुविधा आहे म्हणजेच आधी व्हिसासाठी अर्ज करण्याची गरज नाही. शिवाय येथे करन्सी एक्सचेंजची सुविधाही सहज उपलब्ध आहे.
advertisement
तर, परदेशात लक्झरीचा अनुभव घ्यायचा पण खर्च कमी ठेवायचा असेल, तर लाओस हे तुमच्या ‘ट्रॅव्हल बकेट लिस्ट’मध्ये नक्की असायला हवं.
view comments
मराठी बातम्या/मनी/
'या' देशात गेल्यावर प्रत्येक भारतीय बनतो ‘कोट्यधीश’, फक्त ₹1000 मध्ये मिळतो फाइव्ह स्टार हॉटेलचा आनंद
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement