Gold Price : वाढत्या दराची चमक उतरली, दिवाळीपासून आतापर्यंत किती रुपयांनी स्वस्त झालं सोनं?

Last Updated:

Gold Price : दिवाळीत सोन्याचा दर वाढेल असा अंदाज असताना मात्र प्रत्यक्षात दरात मोठी घसरण झाली.

वाढत्या दराची चमक उतरली, दिवाळीपासून आतापर्यंत किती रुपयांनी स्वस्त झालं सोनं?
वाढत्या दराची चमक उतरली, दिवाळीपासून आतापर्यंत किती रुपयांनी स्वस्त झालं सोनं?
Gold Price :  मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण सुरू होती. सोन्याच्या वाढत्या दराने ग्राहकांच्या चिंतेत भर पडली होती. मात्र, त्यानंतर दरात घसरण सुरू झाली. दिवाळीत सोन्याचा दर वाढेल असा अंदाज असताना मात्र प्रत्यक्षात दरात मोठी घसरण झाली. दिवाळीपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
भारतात नोव्हेंबर महिन्याची सुरुवात सोन्याच्या किमतीत किंचित चढ-उताराने झाली. मात्र, दिवाळीपासून सर्व कॅरेटमधील सोन्याच्या किमतींवर दबाव कायम आहे.

किती रुपयांनी स्वस्त सोनं?

धनत्रयोदशीपासून २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ७.४% म्हणजेच प्रति १० ग्रॅम ९,७७० रुपयांची घसरण झाली आहे. अमेरिका-चीन आणि अमेरिका-भारत व्यापार करारांवर स्पष्टता आल्यानंतरच सोनं-चांदीच्या किमतींची भविष्यातील दिशा निश्चित केली जाईल. तोपर्यंत, बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
२ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १, २३, ००० रुपये, प्रति १०० ग्रॅम १,२३, ००० रुपये, प्रति ८ ग्रॅम ९८,४०० रुपये आणि प्रति ग्रॅम १२,३०० रुपये होती. रविवारी या दरात कोणताही बदल दिसून आला नाही. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत १,१२,७५०, १०० ग्रॅम १,१२,७५००, ८ ग्रॅम ९०,२०० आणि १ ग्रॅम ११,२७५ होती.
advertisement
भारतातील सोन्याच्या किमतींनी धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी १७ ऑक्टोबर रोजी नवीन उच्चांक गाठला होता.
त्या दिवशी २४ कॅरेट सोन्याने प्रति १० ग्रॅम १,३२,७७० या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. तेव्हापासून, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅममध्ये ९,७७० रुपये अर्थात जवळपास ७.३५ टक्क्यांनी घट झाली आहे.

सोन्याच्या दरात वाढ...

या दरम्यानच्या दिवसात सोन्याच्या किंमतीमध्ये किचिंत वाढ झाली होती. त्यानंतर मात्र, पुन्हा घसरण सुरू झाली. आज सोनं-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आली. आता, लग्नसराईचे दिवस सुरू झाले असून सोन्याला पुन्हा एकदा मागणी आली आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. २४ कॅरेट सोन्याचा दर हा जीएसटीसह १ लाख २४ हजार ७४६ रुपये इतका झाला. तर, चांदीचा दर हा जीएसटीसह १ लाख ५४ हजार, ०८८ इतका झाला.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Price : वाढत्या दराची चमक उतरली, दिवाळीपासून आतापर्यंत किती रुपयांनी स्वस्त झालं सोनं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement