Gold Price : सोन्याची किंमत आणखी घसरली, भारतातही झालं स्वस्त, अमेरिका-चीनमध्ये नेमकं काय घडलं?

Last Updated:

Gold Price Fallen: दिवाळीत धनत्रयोदशीनंतर सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. एकाच वेळी घडलेल्या दोन मोठ्या घडामोडीनंतर आता सोन्याचे दर आणखीच घसरले आहेत.

सोन्याच्या किंमती आणखी घसरल्या, भारतातही झालं स्वस्त
सोन्याच्या किंमती आणखी घसरल्या, भारतातही झालं स्वस्त
Gold Price News: सोन्याच्या दराने आपला उच्चांक गाठल्यानंतर घसरण सुरू झाली आहे. दिवाळीत धनत्रयोदशीनंतर सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. एकाच वेळी घडलेल्या दोन मोठ्या घडामोडीनंतर आता सोन्याचे दर आणखीच घसरले आहेत.
सोन्याच्या बाजाराला एकाच वेळी दोन धक्क्यांचा सामना करावा लागला आहे. अमेरिका आणि चीनमधील घडामोडींमुळे सोन्याचा दरावर थेट परिणाम झाला आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या यूएस फेडरल रिझर्व्हने स्पष्टपणे सूचित केले की व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यता नाही. दरम्यान, चीनने सोन्याच्या किरकोळ विक्रेत्यांसाठी कर सवलती रद्द केल्या. या दोन वृत्तानंतर सोन्याच्या दराची चमक कमी झाली. सोन्याच्या दरात प्रति औंस सुमारे ३९४० डॉलरपर्यंत घसरल्या. मागील एक महिन्यातील हा सर्वात कमी दर आहे.
advertisement

>> भारतात सोन्याचा दर काय?

भारतातही सोन्याचा दर दररोज घसरत आहेत. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), ५ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतातील सध्याच्या सोन्याच्या किमती २४ कॅरेटसाठी १,१९,८९१ रुपये प्रति १० ग्रॅम असून २२ कॅरेटचा दर हा १,०९,९०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.
बुधवारी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली.आंतरराष्ट्रीय बाजारात, सोने प्रति औंस ३,९४० डॉलरच्या आसपास व्यवहार करत आहे. हा दर ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनचा सर्वात कमी दर आहे.
advertisement

>> अमेरिका आणि चीनमध्ये काय घडलं?

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने २०२५ मध्ये आणखी दर कपात करण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत दिले. अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले की अर्थव्यवस्था अजूनही मजबूत आहे आणि भविष्यातील धोरण "डेटा-आधारित" असेल. या वक्तव्यानंतर, डिसेंबरमध्ये दर कपातीची बाजारपेठेतील अपेक्षा ९० टक्क्यांवरून ६९ टक्क्यापर्यंत घसरली आहे.
दर कपातीची अपेक्षा कमी झाल्यामुळे, सोन्यावरील दबाव वाढला. सोनं ही एक नॉन-यिल्डिंग मालमत्ता आहे, म्हणजेच त्यावर व्याज मिळत नाही. जेव्हा व्याजदर जास्त राहतात, तेव्हा गुंतवणूकदार त्यांची गुंतवणूक सोन्यापासून रोखे किंवा डॉलरसारख्या उत्पन्न देणाऱ्या मालमत्तेकडे वळवतात. त्याच्या परिणामी, सोन्याच्या मागणीत घट झाली आहे.
advertisement
तर, दुसरीकडे चीनमध्येही मोठी घडामोड घडली. जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक असलेल्या चीनने आपल्या सोन्याच्या किरकोळ विक्रेत्यांसाठी कर सवलती संपवल्या आहेत. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव वाढतील आणि ग्राहकांच्या मागणीवर परिणाम होईल. परिणामी, व्यापाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने विकण्यास सुरुवात केली आहे.

>> नोव्हेंबर महिन्यात भारतात सोन्याचा दर किती कमी?

advertisement
मागील ५ दिवसात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. १ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर हा १,२१,२८४ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. हाच दर ५ नोव्हेंबर रोजी १,१९,८९१ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. मागील पाच दिवसांत सोन्याच्या दरात १,३९३ रुपयांची घट झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याचा दर हा १ नोव्हेंबर रोजी १,११,१७७ रुपये १० ग्रॅम इतका होता. ५ नोव्हेंबर रोजी हा दर आता १,०९,९०० रुपये १० ग्रॅम इतका झाला. याचाच अर्थ २२ कॅरेट सोन्याच्या दरात १,२७७ रुपयांनी घट झाली.
advertisement
आयबीजेएनुसार, ५ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोने अंदाजे १,१९,८९१ रुपये प्रति १० ग्रॅम होते. १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान, २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,३९३ रुपयांनी स्वस्त झाले. या कालावधीत २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,२७७ रुपयांनी स्वस्त झाले. हे दर आयबीजेए बेंचमार्क दरांवर आधारित असून स्थानिक कर आणि मेकिंग शुल्क बदलू शकतात.
advertisement

>> भारतावर काय परिणाम होईल?

जर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा दबाव कायम राहिला तर भारतातील सोन्याच्या किमती आणखी घसरू शकतात. एमसीएक्सवर सोने प्रति १० ग्रॅम ९५,००० रुपयापर्यंत पोहोचू शकते. मात्र, दीर्घकालीन गुंतवणूकदार या घसरणीला खरेदीची संधी मानू शकतात.
डॉलर निर्देशांकात वाढ आणि अमेरिकन बाँड उत्पन्नात वाढ यामुळेही सोन्यावर दबाव निर्माण झाला आहे. मात्र, काही विश्लेषकांचे मत आहे की सध्याची घसरण तात्पुरती आहे. आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजकीय तणाव जागतिक स्तरावर कायम आहेत. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे गुंतवणूकदार वळू शकतात.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Price : सोन्याची किंमत आणखी घसरली, भारतातही झालं स्वस्त, अमेरिका-चीनमध्ये नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement