Gold Silver Price : तुळशीच्या लग्नाआधी सोनं खरेदी करणाऱ्यांची 'चांदी', २४-२२ कॅरेटचे झटपट चेक करा आजचे दर
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Gold Silver Rate : सोन्यासोबत चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सोन्याचा दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
Gold Silver Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू होती. मात्र, गुरुवारी अमेरिकेतील घडामोडीने सोन्याचा दर वधारला होता. मात्र, एक दिवस सोन्याचा दर वाढल्यानंतर आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्यासोबत चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सोन्याचा दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तर, दुसरीकडे गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावरही होत असतो. अमोरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीबाबत असलेले धोरण आणि अमेरिका-चीन व्यापार तणाव कमी झाला. त्याच्या परिणामी डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने, फेडरल रिझर्व्हने आपला प्रमुख व्याजदर ०.२५ टक्क्यांनी कमी केला. तथापि, अमेरिकेतील चालू सरकारी बंद दरम्यान नवीन आर्थिक डेटाचा अभाव असल्याचे कारण देत, फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी संकेत दिले की नजीकच्या भविष्यात धोरणात्मक दरात आणखी कपात होण्याची शक्यता नाही.
advertisement
अमेरिका-चीन व्यापाराबाबत, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील कर १० टक्क्यांनी कमी केले, ज्यामुळे दर ५७ टक्क्यांवरून ४७ टक्क्यांवर आला. ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची दक्षिण कोरियामध्ये भेट झाली. या भेटीनंतर ट्रम्प यांनी सांगितले की दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि दुर्मिळ खनिज घटकांसह अनेक प्रमुख मुद्द्यांवर एकमत झाले आहे. अमेरिकेने टॅरीफ दरात वाढ केल्यानंतर जगभरात याचे पडसाद उमटले. अमेरिका-चीनमधील टॅरीफ वॉरमुळे गुंतवणूकदारांनी बाजारापेक्षा सुरक्षित असलेल्या सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्याच्या परिणामी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. मात्र, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे.
advertisement
>> सोन्याचे आज दर काय?
मुंबईत सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. २४ कॅरेट सोन्याची किंमत १,२२,१५० रुपये इतकी नोंदवण्यात आली. हाच दर जीएसटीसह १,२४, ७३५ रुपये इतका आहे. तर, २३ कॅरेटचा दर १,१७,०५६ इतका असून जीएसटीसह १,१९,५४२ रुपये झाला आहे.
२२ कॅरेटचा दर १,११,९५६ रुपये असून जीएसटीसह १, १४, ३४५ रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर ९१, ७०० नोंदवण्यात आला असून जीएसटीसह ९३, ५३६ रुपये इतकी किंमत आहे.
advertisement
>> चांदीच्या दरात कपात...
सोन्याच्या दरात घसरण होत असताना दुसरीकडे चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. चांदीच्या दरानेही विक्रमी उच्चांक गाठला होता. मात्र, सोन्याच्या दरानंतर चांदीच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली आहे. चांदीचा आजचा दर हा प्रति किलो १, ५४, ०४ रुपये नोंदवण्यात आला असून जीएसटीसह १, ५३, ८४५ रुपये इतका आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 2:36 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price : तुळशीच्या लग्नाआधी सोनं खरेदी करणाऱ्यांची 'चांदी', २४-२२ कॅरेटचे झटपट चेक करा आजचे दर


