Gold Silver Price News : सोन्याच्या दरात घसरण, चांदीचेही भाव आपटले, किती रुपयांनी स्वस्त झालं?

Last Updated:

Gold Silver Price : सामान्य ग्राहकांमध्ये खरेदीसाठी चिंतेचे वातावरण होते. मात्र, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दराला ब्रेक लागल्याचे दिसून आले आहे.

गोल्ड- सिल्व्हर मार्केटमध्ये उलटफेर! फक्त एका निर्णयाने दरात घसरण सुरू
गोल्ड- सिल्व्हर मार्केटमध्ये उलटफेर! फक्त एका निर्णयाने दरात घसरण सुरू
Gold Silver Price : मागील काही दिवसांमध्ये सोनं-चांदीच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. सोनं-चांदीच्या दराने उच्चांक गाठल्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. तर, दुसरीकडे सामान्य ग्राहकांमध्ये खरेदीसाठी चिंतेचे वातावरण होते. मात्र, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दराला ब्रेक लागल्याचे दिसून आले आहे.
अमेरिका-चीनमधील वाढत्या चर्चेमुळे आणि संभाव्य व्यापार कराराच्या अपेक्षांमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोन्याच्या गुंतवणुकीतून नफा वसुली करण्यास सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड २.७% ने घसरून प्रति औंस $४,००२ वर आला, जो सत्रादरम्यान $३,९७० वर आला. हा दर १० ऑक्टोबरनंतरचा सर्वात कमी स्तरावर आहे. आंतरराष्ट्रीय घसरणीचा भारतावरही परिणाम झाल्याने सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली.
advertisement
भारतात, आयबीजेएच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात सोन्याचे दर ९,३५६ रुपयांनी घसरले. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर ९,३५६ रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम १,२१,५१८ रुपयांवर पोहोचले. १८ ऑक्टोबर रोजी, त्याची किंमत १,३०,८७४ रुपये या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली, तर चांदी ₹१,६९,२३० प्रति किलोवरून ₹१,४७,०३३ वर आली.
या वर्षी, सोने ४५,९१५ रुपयांनी महाग झालं तर, चांदी ६९,०१४ रुपयांनी महागली. या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत ₹४५,९१५ ने वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी २४ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ₹७६,१६२ होती, जी आता ₹१,२१,०७७ झाली आहे.
advertisement
या काळात चांदीच्या किमतीतही ६९,०१४ रुपयांनी वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी एक किलो चांदीची किंमत ₹८६,०१७ होती. हाच दर आता १,४५,०३१ रुपये प्रति किलो झाला आहे.

>> सोन्यात ही घसरण का?

गुंतवणूकदार आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील बैठकीतून सकारात्मक घडेल अपेक्षा करत आहेत. व्यापारातील तणाव कमी होण्याची शक्यता असल्याने सुरक्षित सोन्याची मागणी कमकुवत झाली आहे. हाय रिज फ्युचर्सचे धातू व्यापार संचालक डेव्हिड मॅगर म्हणाले, "जर अमेरिका आणि चीनमध्ये करार झाला तर सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेची गरज कमी होईल."
advertisement

> नफा-वसुली

ऑक्टोबरच्या सुरुवातीला सोन्याचा भाव ३,८०० ते ४,४०० डॉलर प्रति औंसपर्यंत होता. मात्र, व्यापार युद्धाची चिंता कमी झाल्यामुळे, गुंतवणूकदारांनी नफा वसुल करण्यास सुरुवात केली.

> फेडरल रिझर्व्हच्या बैठकीवर लक्ष

बाजाराला अपेक्षा आहे की फेड या आठवड्यात व्याजदरात ०.२५% कपात करेल. कमी दराच्या वातावरणात सोने सामान्यतः मजबूत राहते, परंतु यावेळी बाजार व्यापार कराराच्या संकेतावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे.
advertisement
कॅपिटल इकॉनॉमिक्सने २०२६ च्या अखेरीस सोन्याच्या किमतीचे टार्गेट ३,५०० डॉलर प्रति औंसपर्यंत कमी केले. ऑगस्टपासूनची २५ टक्क्यांची वाढ "अवास्तव" आहे आणि अशी गती टिकवणे कठीण होईल. दरम्यान, काही विश्लेषक मानतात की जर व्याजदर कमी राहिले तर येत्या काळात सोने ५,००० डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. चांदी ४.८% घसरून ४६.२८ डॉलर प्रति औंस इतकी झाली.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price News : सोन्याच्या दरात घसरण, चांदीचेही भाव आपटले, किती रुपयांनी स्वस्त झालं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement